मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mint for Weight Loss: झटपट वजन कमी करण्याचा सोपा उपाय; पुदीना असा 3 पद्धतींनी वापरा

Mint for Weight Loss: झटपट वजन कमी करण्याचा सोपा उपाय; पुदीना असा 3 पद्धतींनी वापरा

विशेषत: उन्हाळ्यात अनेकांना प्रवासाचा त्रास होतो, यासाठी पुदिन्याची पाने, पुदिन्याच्या गोळ्या किंवा त्याचे सरबत सोबत ठेवा. जेव्हा प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण वाटेल तेव्हा ते घ्या.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

विशेषत: उन्हाळ्यात अनेकांना प्रवासाचा त्रास होतो, यासाठी पुदिन्याची पाने, पुदिन्याच्या गोळ्या किंवा त्याचे सरबत सोबत ठेवा. जेव्हा प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण वाटेल तेव्हा ते घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

लठ्ठपणा हे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (high blood pressure), हृदयरोग (heart disease) यासारख्या घातक आजारांचे प्रमुख कारण आहे. वजन कमी करण्यासाठी पुदीनाही उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की पुदिन्याने तुम्ही वजन कसे कमी करू शकता? जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 एप्रिल : लठ्ठपणा (Obesity) ही सध्या संपूर्ण जगातील मोठी समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, संपूर्ण जगात 1.9 अब्ज लोक लठ्ठ आहेत. दरवर्षी 40 लाख लोकांचा लठ्ठपणामुळं अकाली मृत्यू होतो. लठ्ठपणा हे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (high blood pressure), हृदयरोग (heart disease) यासारख्या घातक आजारांचे प्रमुख कारण आहे. वजन कमी करण्यासाठी पुदीनाही उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की पुदिन्याने तुम्ही वजन कसे कमी करू शकता? पण आम्ही तुमच्यासाठी असे काही 3 उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा.

मिंट आणि लिंबाचा रस

झीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार, पुदिन्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु, ते पिण्याची योग्य पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही पुदिना आणि लिंबू यांचे मिश्रण बनवू शकता. पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या गोष्टी पुदिन्यात मिसळा

शरीरातील नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने आपले शरीर चांगले डिटॉक्स होईल. यासाठी अर्धे सफरचंद, डाळिंबाचे दाणे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात टाकू प्या. वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

हे वाचा - अंडी खाण्याच्याबाबतीत ही चूक कधीही करू नका; किडनी खराब होण्याचं कारण ठरू शकतं

पुदिना आणि कोथिंबीर

याशिवाय पुदिन्यासोबत कोथिंबीरही मिक्स करू शकता. पुदिन्यासोबतच कोथिंबीरही वजन कमी करण्यास मदत करते. दोन्ही पानांचा एकत्र वापर केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

हे वाचा - Diabetes रुग्णांनी आहार सांभाळला की NO टेन्शन! दुपारच्या जेवणात असावेत हे पदार्थ

पुदिन्याच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला मिळतील -

पुदिना औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.

वजन कमी करण्यासोबतच यामुळे अनेक आजार आपल्याला होणार नाहीत.

अपचन होत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता

निरोगी त्वचेसाठीही तुम्ही पुदिन्याचे पाणीही पिऊ शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips