नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : पावसाळ्यात (Monsoon) खराब वातावरणामुळे किडे,मुंग्या आणि मच्छर वाढायला लागतात. कधीकधी एखादा किडा आपल्याला चावल्यानंतर (Insect Bite) त्याची जाणीव उशारी होते आणि त्या ठिकाणी (Affected Area) खाज, जळजळ व्हायला लागते. तिथे चट्टे (Scars) उठतात आणि त्वचेचं नुकसान होतं. त्वचेवरचे डागही लवकर जात नाहीत. डाग घालवण्यासाठी हे छोटे उपायही (Easy Remedies) करू शकता.
डागावर मध लावा
मच्छर, किडा चावलेल्या भागावर मध लावू शकता. मधात अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेवरील डाग काढण्याबरोबरच त्वचेशी संबंधित इतर अनेक त्रासांपासून संरक्षण करण्यास याची मदत होते. डाग असलेल्या ठिकाणी मध लावून 5 मिनिटं हलक्या हाताने मॉलिश करा. यामुळे हळूहळू डाग कमी होऊ लागतील. किडा चावल्याने जळजळ किंवा खाज येत असेल तर, त्यातही आराम मिळेल.
(पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा)
चंदनाचा लेप
मच्छर, किडा चावल्याने त्वचेची जळजळ होत असेल तर,चंदन थंडावा देण्याचं काम करेल किंवा चट्टा पडला असेल तर, कमी होईल. चंदन पावडरपेक्षा चंदनाचं लाकूड उगाळून लावा. चंदन पावडर वापरताना गुलाबपाण्यात मिक्स करून पेस्ट चट्ट्यांवर लावा. वाढल्यानंतर धुवून टाका. जळजळ आणि डाग कमी होतील.
(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)
कोरफड जेल लावा
डाग बरे करण्यासाठी कोरफड जेल वापरू शकतो. कोरफड जेलमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचेसाठी उपयोगी मानली जाते. चट्टे असलेल्या भागावर कोरफड जेल लावा. 5 मिनिटं हलक्या हाताने मॉलिश करा. लवकर बरं होण्यासाठी शक्य असल्यास रात्रभर जेल लावून ठेवा.
(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण...)
ऑलिव्ह ऑईल
त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करता येतो. या तेलात अॅन्टीबॅक्टेरियल गुण आढळतात. त्वेचवरील डाग आणि इतर समस्यांमध्ये उपयोगी आहे. डाग असलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईलने 5 मिनिटं मॉलिश करा. शक्य असल्यास, तेलामध्ये 2 थेंब लिंबाचा रस घालून वापरता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home remedies, Lifestyle