Home /News /lifestyle /

पृथ्वी विकत घ्यायला लागतील इतके पैसे, हा ग्रह तर अवघ्या 75 पैशांचा, पण...

पृथ्वी विकत घ्यायला लागतील इतके पैसे, हा ग्रह तर अवघ्या 75 पैशांचा, पण...

शुक्र हा ग्रह सर्वांत स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या ग्रहाची किंमत केवळ 70 पैसे काढण्यात आली आहे.

शुक्र हा ग्रह सर्वांत स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या ग्रहाची किंमत केवळ 70 पैसे काढण्यात आली आहे.

शुक्र हा ग्रह सर्वांत स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या ग्रहाची किंमत केवळ 70 पैसे काढण्यात आली आहे.

    मुंबई, 27 जानेवारी : तुम्ही कधी विचार केला आहे का, की पृथ्वीची किंमत काय असू शकते? जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुम्ही पृथ्वी खरेदी करू शकता, तर तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्या खिशात तेवढे पैसे असतील, तर तुम्ही संपूर्ण पृथ्वीचे मालक होऊ शकता. जगात फुकटात काहीच मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. जवळजवळ प्रत्येक गोष्टीचं निश्चित मूल्य असतं. पृथ्वीची किंमत (Price Of Earth) किती आहे, हे जाणून घेऊ या. 2022 मधल्या परिस्थितीनुसार Treehugger.com ने नुकताच पृथ्वीच्या किमतीचा अंदाज बांधला आहे. पृथ्वी, जमीन, नदी, खनिजं आणि अन्य गोष्टींची किंमत 3,76,25,80,00,00,00,00,060 रुपये (3 लाख 76 हजार 258 ट्रिलियन) इतकी आहे. तुमच्याकडे इतके पैसे असतील, तर तुम्ही संपूर्ण पृथ्वी विकत घेऊ शकता. एवढी मोठी रक्कम मोजायला काही महिने लागतील. तसंच मशीनच्या साह्याने मोजणी केली, तरी यासाठी एक नाही तर अनेक मशीन्स लागतील आणि नोटा मोजण्यातच काही महिने निघून जातील. (पोलिसांच्या सरावादरम्यान गोळी सुटली आणि गावकऱ्यांचा घरात आदळली, अलिबागमधील घटना) संपूर्ण सूर्यमालेतला पृथ्वी हा सर्वांत महागडा ग्रह आहे. पृथ्वीची किंमत पाहून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पृथ्वीची किंमत कोणत्या आधारावर ठरवण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या सारसल विद्यापीठातले सहायक प्राध्यापक ग्रेग लॉफलिन यांनी पृथ्वीचं मूल्य एका विशेष सूत्रावरून ठरवलं आहे. हे सूत्र फारसं वैज्ञानिक नाही; मात्र यामध्ये पृथ्वीचा आकार, वस्तुमान, तापमान, वय आणि इतर अनेक घटक लक्षात घेण्यात आले आहेत आणि त्यावरून पृथ्वीची किंमत काढण्यात आली. प्राध्यापक ग्रेग लॉफलिन यांनी फक्त पृथ्वीचीच नाही, तर सूर्यमालेतील इतर अनेक ग्रहांची किंमत काढली आहे. ग्रेग यांनी मंगळाची किंमत फक्त 12 लाख 2 हजार रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे. शुक्र हा ग्रह सर्वांत स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. या ग्रहाची किंमत केवळ 70 पैसे काढण्यात आली आहे. (108 MP कॅमेरा असलेला Redmi Note 11 Pro 5G मोबाईल भारतात लवकरच लाँच होणार) प्रत्यक्षात पृथ्वी कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्याच्या किमतीचा अंदाज लावण्यामागे एक मोठं कारण असल्याचे ग्रेग यांनी म्हटलं आहे. ग्रेग यांच्या मते, आपण किती मौल्यवान पृथ्वीवर राहत आहोत, हे पृथ्वीवासीयांना माहीत असलं पाहिजे. फुकट मिळतं म्हटल्यावर माणसाला तिचं मूल्य नसतं. पृथ्वीवर फुकटात जगण्याची संधी मिळाली, तर त्याची कदर करायला हवी.
    First published:

    पुढील बातम्या