मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Earth Hour 2022: पुढचा एक तास घरातले दिवे करा बंद! जागतिक मोहिमेत सहभागी कसं व्हायचं वाचा

Earth Hour 2022: पुढचा एक तास घरातले दिवे करा बंद! जागतिक मोहिमेत सहभागी कसं व्हायचं वाचा

आपल्या वसुंधरेसाठी एक तास आपण एवढं तर नक्की करू शकतो. काय आहे Earth Hour या जागतिक मोहिमेची संकल्पना? तुम्ही कसे सहभागी होऊ शकाल या मोहिमेत?

आपल्या वसुंधरेसाठी एक तास आपण एवढं तर नक्की करू शकतो. काय आहे Earth Hour या जागतिक मोहिमेची संकल्पना? तुम्ही कसे सहभागी होऊ शकाल या मोहिमेत?

आपल्या वसुंधरेसाठी एक तास आपण एवढं तर नक्की करू शकतो. काय आहे Earth Hour या जागतिक मोहिमेची संकल्पना? तुम्ही कसे सहभागी होऊ शकाल या मोहिमेत?

नवी दिल्ली, 26 मार्च : जगभरात आज रात्री (शनिवारी, 26 मार्च 2022) 8.30 ते 9.30 या कालावधीत एक तासाचा अर्थ अवर (Earth Hour) पाळण्यात येणार आहे. हवामानबदल, ऊर्जासंवर्धन आणि निसर्ग संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी दर वर्षी अर्थ अवर डे (Earth Hour Day) साजरा केला जातो. जगभरातले लाखो नागरिक या मोहिमेत (Earth Hour Day Campaign) सहभागी होत असतात. या मोहिमेत सहभागी होणारे नागरिक रात्री साडेआठ ते साडेनऊ अशा एक तासासाठी घरातले आणि कार्यालयातले दिवे बंद करतात. अर्थ अवर साजरा करण्यामागे काही कारणं आहेत. तसंच या मोहिमेचा खास असा इतिहास आहे. याविषयीची माहिती 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केली आहे.

'ही' आहे यंदाच्या अर्थ अवरची थीम

विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 'अर्थ अवर 2022'चं नियोजन केलं जातं. अर्थ अवर 2022ची थीम 'आमच्या भविष्याला आकार द्या' (Shape Our Future) या विषयावर आधारित असेल.

Real Honey: मध खरेदी करताना फसवणूक होऊ शकते; भेसळयुक्त मध असा लगेच ओळखता येतो

 प्रत्येकासाठी आणि आपल्या जगासाठी हे एक महत्त्वपूर्ण वर्ष आहे. आज आपल्या जगावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल जागरूकता वाढवून आपल्या भविष्याला आकार देणं हे आपल्यावर अवलंबून आहे.

मोहिमेत 'या' पद्धतीने तुम्ही होऊ शकता सहभागी

तुम्ही तुमच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 ते 9.30 वाजण्याच्या कालावधीत तुमच्या घरातले किंवा कार्यालयातले दिवे बंद करून अर्थ अवर मोहिमेत सहभागी होऊ शकता. 'अर्थ अवर'च्या अधिकृत वेबसाइटवर या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सात मार्ग सांगण्यात आले आहेत. त्यानुसार, मोहिमेचे समर्थक म्हणून तुम्ही एक तास लाइट्स बंद ठेवू शकता. तसंच निर्सगाच्या (Nature) सान्निध्यात राहू शकता किंवा स्थानिक पातळीवर आयोजित अर्थ अवर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता. या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांनी केवळ एक तास कृती करण्यापेक्षा त्यापुढेही पाऊल टाकावं. समर्थकांनी जागतिक वन्यजीव निधी अर्थात 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'च्या (WWF) स्थानिक प्रकल्पांना सहकार्य करावं. स्वतःच्या देशातल्या अर्थ अवर मोहिमेत सहभागी व्हावं. तसंच कम्युनिटीमध्ये या विषयांवर जनजागृती करण्यासाठी चळवळ सुरू करावी, अशी शिफारस 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'ने केली असल्याचं 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

असा आहे अर्थ अवर मोहिमेचा इतिहास

नागरिकांमध्ये हवामान बदलाविषयी (Climate Change) जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशानं जागतिक वन्यजीव निधी आणि सहयोगी संस्थांनी 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या (Australia) सिडनी (Sydney) येथे प्रतीकात्मक लाइट-आउट इव्हेंट आयोजित केला. त्याचं रूपांतर अर्थ अवर मोहिमेत झालं. सिडनीत सुरू झालेल्या या मोहिमेचं रूपांतर आता जागतिक चळवळीत झालं असून, ही मोहीम तळागाळापर्यंत पोहोचली आहे. दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर साजरा केला जातो. 2022 या वर्षातला अर्थ अवर आज अर्थात 26 मार्चला साजरा होत आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वाजता अर्थ अवर सुरू होईल आणि 9.30 वाजता तो संपेल. 190 हून अधिक देश आणि प्रदेशांमधले लाखो नागरिक पृथ्वीविषयी आदर व्यक्त करण्यासाठी या मोहिमेत सहभागी होतात. एक तासासाठी घरातले आणि कार्यालयातले दिवे बंद केले जातात.

आणखी एक जग आहे, जिथे कालचक्र उलटं फिरतं! शास्त्रज्ञांनाही पटतेय खात्री

 तसंच या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सिडनी ऑपेरा हाउस, गेटवे ऑफ इंडिया, चीनमधलं बीजिंग फिनिक्स सेंटर, जर्मनीतलं ब्रॅंडनबर्ग गेट, इटलीतलं कोलोझियम, युनायटेड स्टेट्समधली एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि ब्राझिलमधल्या क्राइस्ट द रिडीमर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणचे सर्व दिवे एक तास बंद करण्यात येणार आहेत. हवामानबदलाबाबत जागरुकता वाढावी, यासाठी 2007 पासून लाखो नागरिकांनी या जागतिक मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.

'अर्थ अवर'चा हेतू आणि उपाय

आपल्या आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दैनंदिन जीवनात पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व आपण ओळखतो. प्रदूषणमुक्त वातावरण (Pollution free environment) आणि हरित जग (Green World) हे रोगमुक्त जीवन जगण्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे. केवळ संरक्षित वातावरणच आपल्याला आनंदाने जगण्यासाठी आवश्यक संसाधनं आणि ठिकाणं पुरवू शकते. वाढती लोकसंख्या आणि संसाधनांचा बेसुमार वापर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि या स्थितीला माणूस कारणीभूत आहे. दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही मानवाची आहे.

अशा स्थितीत पर्यावरण संरक्षणाबाबत जागरुकता वाढवणं, निसर्गाचं रक्षण करणं, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करणं, उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करणं, तसंच या विषयांवर जागतिक पातळीवर संवाद साधणं ही अर्थ अवरची उद्दिष्टं आहेत, अशी माहिती जागतिक वन्यजीव निधीने अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

अर्थ अवर मोहिमेमुळे हवामानबदल रोखण्यासंबंधी विविध कामं सुरू झाली आहेत. जागतिक वन्यजीव निधीच्या युगांडामधल्या (Uganda) शाखेनं 2013 मध्ये पहिल्या अर्थ अवर वनाची निर्मिती केली. तसंच 2013 मध्ये अर्जेंटिनाने (Argentina) अर्थ अवर मोहिमांचा उपयोग देशातल्या 3.4 दशलक्ष हेक्टर (8.4 दशलक्ष एकर) सागर संरक्षित क्षेत्रासंदर्भात सिनेट बिल पास करण्यासाठी केला, अशी माहिती जागतिक वन्यजीव निधीने दिली आहे.

First published:

Tags: Earth, Environment