हिऱ्याच्या कानातल्याची किंमत किती? फक्त 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये

हिऱ्याच्या कानातल्याची किंमत किती? फक्त 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये

अपोलो ब्ल्यू आणि अर्थेमिटस पिंक असे हे दोन डायमंड. जीनिव्हात एका शानदार सोहळ्यात हा लिलाव झाला.

  • Share this:

17 मे : एखाद्या कानातल्याची किंमत असून असून किती असणार ? फार फार तर एक किंवा दोन कोटी. पण आपले डोळे चक्क पांढरे होतील अशा किमतीच्या कानातल्याचा जीनिव्हात लिलाव झाला आणि त्यांची किंमत होती 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये.

अपोलो ब्ल्यू आणि अर्थेमिटस पिंक असे हे दोन डायमंड. जीनिव्हात एका शानदार सोहळ्यात हा  लिलाव झाला . आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा कानातल्याचा जोड जरी एकाच व्यक्तीने खरेदी केला असला तरी प्रत्येक कानातल्याचा लिलाव मात्र वेगळा झाला.

एक नक्की बरेलीतल्या बाजारात झुमका हरवणं हे या कानातल्याच्या बाबातीत मात्र शक्य नाही. त्याला आपला काळ एखाद्या सौंदर्यवतीच्या कानात आणि उरलेला वेळ तिजोरीतच घालावा लागेल एवढं नक्की.

First published: May 17, 2017, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading