नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या हंगामात कोंबडीच्या अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत आपण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. या व्यवसायासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. या व्यवसायाची कल्पना देखील चांगली आहे आणि कमाईसुद्धा यातून उत्तम मिळते. यासाठी शिक्षणाची गरज नाही ना जास्त पैशाची. त्याबद्दल काही आणखीन गोष्टी जाणून घेऊया.
कोंबड्यांचं पालन करण्यासाठी आधी एक व्यवस्थित जागा आवश्यक आहे. हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करण्यासाठी खूप मोठ्या जागेची आवश्यकता नसते. मात्र तुम्हाला जर हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता आहे. यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नाही. फक्त स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश असावा आणि वाहतुकीसाठी पुरेशी व्यवस्था असावी असं ठिकाण या व्यवसायासाठी आवश्यक आहे.
या व्यवसायात तुम्हाला अंडी आणि मांस ही दोन उत्पादनं मिळतात जी बाजारात विकली जातात. उत्पादनाची प्रक्रिया आणि बॉयलर प्रजननाची प्रक्रिया याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच यात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. यासाठी सरकारच्या 'बॉयलर प्लस' योजनेअंतर्गत सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. तसंच अनेक लोकांना या व्यवसायाद्वारे रोजगार मिळू शकतो.
हे वाचा - याला म्हणतात छप्पर फाडून देणं; घरावर कोसळला दगड आणि काही क्षणात तो झाला करोडपती
कुक्कुटपालनासाठी कोणत्याही सरकारी बँकेतून कर्ज घेता येतं. या व्यवसायाच्या एकूण खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज देते. या योजनेला बॉयलर प्लस योजना असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय स्टेट बँक 5000 कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मसाठी 3,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देते. एसबीआयकडून 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलं जाऊ शकतं. बँकेला याची परतफेड तुम्हाला पाच वर्षांत करावी लागते. जर काही कारणास्तव आपण पाच वर्षांत कर्जाची परतफेड केली नाही. तर बँकेकडून परतफेडीसाठी जादाचा सहा महिन्यांचा कालावधी तुम्हाला दिला जातो.
हे वाचा - खूशखबर! या सरकारी बँकेत आहे नोकरीची संधी,30 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख
कर्ज घेण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक असतात. सर्वप्रथम ओळख पटवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी काही कागदपत्रं तुम्हाला दाखवावी लागतात. ॲड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्ड, विजेचं बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी बिल ही कागदपत्रं दाखवावी लागतात. तसंच दोन पासपोर्ट साइज फोटो, ॲड्रेसप्रूफ बँकेच्या खात्याचं स्टेटमेंट फोटोकॉपी आणि पोल्ट्री फार्मिंगचा प्रकल्प अहवाल बँकेत द्यावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pay the loan, Start business