रेल्वेसोबत कमाई करण्याची सुवर्णसंधी; नव्या योजनेअंतर्गत तुम्हालाही मिळतील लाखो रुपये

रेल्वेसोबत कमाई करण्याची सुवर्णसंधी; नव्या योजनेअंतर्गत तुम्हालाही मिळतील लाखो रुपये

रेल्वेच्या (Indian railway) नव्या योजनेत तुम्ही सहभागी होऊन पैसे कमवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा विचार करत आहात का? तर आता तुम्ही भारतीय रेल्वेच्या (Indian railway) विशेष धोरणाद्वारे चांगले पैसे कमवू शकता. भारतीय रेल्वे आपल्याला पैसे कमवण्याची उत्तम संधी देत आहे. रेल्वे मंत्रालयाने खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून छोट्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या स्थानकांवर 'गुड्स शेड डेव्हलमेंट पॉलिसी' सुरू केली आहे. तुम्हीसुद्धा रेल्वेच्या या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकता.

रेल्वे मंत्रालयाच्या 'गुड्स शेड डेव्हलमेंट पॉलिसी' अंतर्गत नवीन शेड उभारण्यात येणार आहेत. खासगी कामगारांच्या मदतीने जुन्या शेड सुधारल्या जातील. या व्यतिरिक्त अस्तित्वात असलेल्या शेडचा विकास करून त्याची क्षमता वाढवण्याचं लक्ष्य सध्या रेल्वेचं आहे. जर रेल्वेच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून रेल्वेला मदत केली तर रेल्वे तुम्हाला स्टेशनच्या आसपास छोटं कॅन्टीन, चहाचं दुकान, जाहिरात करण्यासाठी एखादी जागा उपलब्ध करून देणार आहे. ज्याद्वारे तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

हे वाचा - तुमच्याकडे आहेत का 5-10 रुपयांची अशी नाणी; घरबसल्याच व्हाल लखपती

याशिवाय प्रायव्हेट कंपन्यांना रेल्वेत वस्तू चढवण्याचा-उतरवण्याच्या सुविधा, कामगारांसाठी सुविधा, संपर्क रस्ता, कव्हर्ड शेड आणि इतर संबंधित सुविधा विकसित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या सर्व सुविधा विकसित करण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांना त्यांचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. हे सर्व रेल्वेच्या परवानगीनुसार होईल.  रेल्वे प्रायव्हेट कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचं विभागीय शुल्क घेणार नाही. प्रायव्हेट कंपन्यांनी तयार केलेल्या सुविधा सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वापरल्या जाणार आहेत.

हे वाचा - कोरोनाच्या काळातही ही सरकारी गुंतवणूक योजना देतेय 12 टक्के रिटर्न

IRCTC साठी कमाईचा मोठा स्त्रोत म्हणजे ई-तिकिटांवरील सेवा कर. नोटबंदीनंतर जवळपास तीन वर्षे त्यांनी आपलं उत्पन्न गमावलं होतं तसंच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने सेवा शुल्काची वसूली थांबवली होती. आता ई-तिकिटांतूनही रेल्वे कमाई करू शकते.

Published by: Priya Lad
First published: October 20, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या