तुमच्याकडे आहेत का 5-10 रुपयांची अशी नाणी; घरबसल्याच व्हाल लखपती

तुमच्याकडे आहेत का 5-10 रुपयांची अशी नाणी; घरबसल्याच व्हाल लखपती

तुमच्याकडे 5-10 रुपयांची नाणी (coin) असतील तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे, कित्येक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी काही ना काही मार्ग शोधत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त घरबसल्याच लाखो रुपये मिळत असतील असं कुणी सांगितलं तर. धक्का तर बसलेच पण विश्वासही बसणार नाही. मात्र हे खरं आहे. तुम्ही घरबसल्या लखपती होऊ शकता, पण त्यासाठी तुमच्याकडे 5 आणि 10 रुपयांची ही नाणी (coin) असायला हवीत.

काही ई-कॉमर्स कंपन्यादेखील पैसे कमवण्यासाठी चांगली संधी देत आहेत. अशीच एक संधी म्हणजे तुमच्याजवळील 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यातून तब्बल 10 लाख रुपये कमवण्याची. या नाण्याचा फोटो एका वेबसाईटवर टाकायचा आहे. यानंतर तिथं हे नाणं खरेदी करण्यासाठी बोली लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला ज्या किमतीला हे नाणं विकायचं आहे, तुम्ही विकू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता.

हे वाचा - तुमच्याकडे आहे 'ही' 10 रुपयांची नोट? घरबसल्या 25 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम

मीडिया रिपोर्टनुसारच्या मते, इंडिया मार्ट वेबसाईटवर जुनी नाणी आणि नोटांचा लिलाव होणार आहे. इथं तुम्ही 5 किंवा 10 रुपयांची नाणी विकू शकता. मात्र या नाण्यांवर वैष्णो देवी असायला हवी.  वैष्णौ देवी असणारी नाणी 2002 साली जारी करण्यात आली आहेत. देवी असल्याने या नाण्यांना लोक नशीबवान मानतात आणि त्यामुळे या नाण्यांसाठी लोक लाखो रुपये खर्च करत आहेत.

हे वाचा - Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झाले बदल; सणासुदीच्या हंगामात जा

त्यामुळे तुम्हाला जुनी नाणी जमवण्याची हौस असेल, तुमच्याकडे आधीपासूनच अशी नाणी असतील तर मग काय तुमचं नशीबच बदलेल. तुमच्याकडे असणारी नाणी तपासा आणि त्यामुळे तुम्हाला वैष्णो देवी असलेली 5 किंवा 10 रुपयांची नाणी पाहा.  तुमच्याकडे जर असं एखादं जरी नाणं असेल तर तुम्ही ते लिलावात विकून 10 लाख रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.

या वेबसाईटवर करू शकता नाण्यांचा लिलाव

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

Published by: Priya Lad
First published: October 19, 2020, 7:29 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या