मुंबई, 05 जानेवारी : गरूड (eagle) आपल्या नजरेसाठी ओळखला जातो. त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की अगदी उंचावरूनही तो आपली शिकार अगदी बरोबर हेरतो. पण त्याची हे नजरच नाही तर त्याच्या डोळेही अनोखे आहेत. विशेषत: त्याच्या डोळ्यांच्या पापण्या आणि त्यांची उघडझाप. गरूडाच्या डोळ्यांचा हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.
माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी सामान्यपणे पापण्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला होताच. वरून खाली म्हणजे अप आणि डाऊन अशी त्यांची हालचाल होते. पण गरूडाच्या पापण्यांची हालचाल मात्र अपडाऊन नव्हे तर फ्रंट टू बॅक अशी होते. म्हणजे नेमकी कशी यासाठी हा व्हिडीओ पाहा. म्हणजे तुम्हाला समजेल.
This is how an #eagle blinks. Incredible captured by the slow mo guys. They have nictating membrane which slide across eyes from front to back, wiping dust & dirt. Watch to believe. pic.twitter.com/4ZmYCLEyuG
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 4, 2021
व्हिडीओत पाहू शकता एका गरूडाला एका ठिकाणी स्थिर बसवलेलं आहे. त्यांच्यासमोर कॅमेरा आहे. काही फोटोग्राफर त्याचे व्हिडीओ शूट करत आहेत. त्यांनी विशेषतः गरूडाच्या डोळ्यांवर फोकस केलं आहे. गरूडाच्या डोळ्यांची हालचाल त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. गरूडाच्या डोळ्यांनी तर लक्ष वेधलं आहे पण त्यापेक्षा सर्वात जास्त लक्षवेधी ठरल्या त्या त्याच्या डोळ्यांतील पापण्या.
हे वाचा - दुबईच्या प्रिन्सची शहामृगासोबत शर्यत; VIDEO पाहून तुम्हीच सांगा विजेता कोण?
गरूडाच्या डोळ्यांच्या हालाचालीचा हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याच्या डोळ्यांच्या वरच्या दिशेनं नव्हे तर पुढील बाजून पापण्या येतात आणि त्या मागच्या दिशेनं जातात. या पापण्या इतक्या पातळ आहेत जणू काय गरूडाच्या डोळ्यात एखादं प्लॅस्टिकच असल्यासारखं वाटतं. एखादा स्लाइड डोअर किंवा स्लाइड शटर असावं तशाच या गरूडाच्या डोळ्यांच्या पापण्या आहेत. हा व्हिडीओ पाहतच राहावा असा वाटतो.
हे वाचा - VIDEO : भरपावसात हत्तीणीने दिला पिल्लाला जन्म, कुटुंबाने मिळून आनंद केला साजरा
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. गरूड डोळे कसे मिचकावतो ते पाहा. त्याच्या डोळ्यात असा पडदा असतो जो त्याच्या डोळ्यातील घाण आणि धूळ स्वच्छ करतो, अशी माहिती कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटरवर दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos