खरंच रावण होता का 10 तोंडी? जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या फारशा कोणाला माहीत नाहीत

खरंच रावण होता का 10 तोंडी? जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या फारशा कोणाला माहीत नाहीत

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण रावणाशी निगडीत काही अशाही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत.

  • Share this:

येत्या 8 ऑक्टोबरला संपूर्ण भारतात दसरा साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मानुसार याच दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण रावणाशी निगडीत काही अशाही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. असं म्हटलं जातं की, रावणाला 10 तोंडं होती. पण यात खरंच तथ्य आहे हा?

काहींच्यामते, रावणाला 10 तोंडंं नव्हती. पण लोक त्याला दशानन म्हणायचे त्यामुळे रावण त्याला 10 तोंडं असल्याचा भ्रम निर्माण करू शकत होता. जैन शास्त्रात उल्लेख केल्यानुसार, रावणाच्या गळ्यात मोठे असे नऊ गोलाकार मणी असायचे. त्या नऊ मण्यांमध्ये त्याचं डोकं दिसायचं ज्यामुळे त्याला 10 डोकं असल्याचा भ्रम तयार झाला होता.

मान्यतांनुसार, मेघनाथच्या जन्माच्याआधी रावणाने ग्रह- नक्षत्रांना स्वतःच्या हिशोबाने सजवले होते. यामागचं मुख्य कारण हे त्याचा मुलगा अमर व्हावा हे होतं. पण अगदी शेवटच्या क्षणी शनीने आपली चाल बदलली. रावण एवढा शक्तीशाली होता की त्याने शनीला त्याच्याकडे बंदी म्हणून ठेवले.

रावणाला वेद आणि संस्कतचं उत्तम ज्ञान होतं. तो साम वेदात निपुण होता. असं म्हटलं जातं की त्याने शिवतांडव, युद्धीशा संत्र आणि प्रकुठा कामधेनुसारख्या कृतींची रचना केली. सामवेदाशिवाय त्याला इतर तीन वेदांचेही ज्ञान होते.  याशिवाय रावणाला संगीताचीही आवड होती. रुद्र वीणा वाजवण्यात रावणाचा हात कोणीही धरू शकत नव्हता. रावण जेव्हाही अस्वस्थ व्हायचा तो रुद्र वीणा वाजवायचा असं म्हटलं जातं.

Breast Cancer Awareness Month: जाणून घ्या Breast Cancer ची लक्षणं

तब्बल 400 तास लावून टॉयलेट पेपरपासून तयार केलेला वेडिंग ड्रेस पाहिलात का?

हे आहेत जगातील सर्वात धोकादायक देश! इथे जायची हिंमत तुम्ही दाखवाल का...

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 03:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading