आयुर्वेदानुसार श्रावणात हे पदार्थ कधीही खाऊ नयेत!

आयुर्वेदानुसार श्रावणात हे पदार्थ कधीही खाऊ नयेत!

श्रावणात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण या मौसमात इन्फेक्शनचा धोका सर्वाधिक असतो.

  • Share this:

श्रावणात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण या मौसमात इन्फेक्शनचा धोका सर्वाधिक असतो. हवामानानुसार, खाण्याच्या बाबतीत आयुर्वेदात विशेष माहिती देण्यात आली आहे. जे पदार्थ खाल्ल्याने पोटात गॅस होतो असे पदार्थ खाण्यावर आयुर्वेदाने मनाई केली आहे. पण नेमकी हे पदार्थ कोणते याबद्दल आज आपण वाचणार आहोत.

आयुर्वेदानुसार, श्रावणात हिरव्या भाज्या शक्यतो खाऊ नयेत. या भाज्या खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. याशिवाय भाज्यांवर हिरव्या रंगाचे किडे असतात. अनेकदा हे किडे डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक आजार होऊ शकतात.

श्रावणात वांगही खाणं टाळावं. पोटात गॅस तयार होणाऱ्या भाज्यांमध्ये आयुर्वेदाने वांग्याचाही समावेश केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात वांग खाण्यापासून स्वतःला रोखा. पावसात वांग्यात अनेक किडे लागतात. कोणत्याही ऋतूत वांग्याची भाजी करण्यापूर्वी त्यात हंग नक्की टाकावं. यामुळे गॅसची समस्या होणार नाही.

पावसाच्या काळात दूध आणि दह्याचे पदार्तही जास्त प्रमाणात खाऊ नयेत. जास्तप्रमाणात दुग्धजन्य पदार्थ खाल्याने पोटात गॅस होऊ शकतो. दही थंड असतं, त्यामुळे पावसाळ्यात जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो.

पावसाळ्यात पचनप्रक्रिया कमकूवत होते. त्यामुळे आयुर्वेदात या काळात मांसाहार करू नये असंही सांगण्यात आलं. या ऋतूत अतीप्रमाणात मांसाहार केला कर पोटाचे आजार उद्भवू शकतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसतात ही लक्षणं, एकगा तुम्हीही वाचा!

Sawan 2019: ...म्हणून श्रावणात महिला हिरव्या रंगाचे कपडे घालतात

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

रेड मीट खाल्याने महिलांमध्ये वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका!

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 08:35 PM IST

ताज्या बातम्या