Home /News /lifestyle /

मासिक पाळीच्या काळातही आवश्यक असतो योग्य आहार, उत्तम आरोग्यासाठी आहारात करा 'हे' बदल

मासिक पाळीच्या काळातही आवश्यक असतो योग्य आहार, उत्तम आरोग्यासाठी आहारात करा 'हे' बदल

मासिक पाळीच्या काळात महिला आणि मुलींनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. या काळात मुलींना भरपूर पोषणाची गरज असते. अशा परिस्थितीत काही खास गोष्टींचा आहारात (Diet During Periods) समावेश करणे योग्य ठरते.

  मुंबई, 6 जुलै : महिलांनी मासिक पाळीदरम्यान (Periods) स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, प्रामुख्याने यावेळी त्यांनी त्यांच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पीरियड्सच्या काळात शरीरात खूप अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे अशा वेळी फक्त पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. जो शरीराला उत्तम पोषण देण्यासोबतच वेदनांवरही प्रभावी ठरतो. पीरियड्स दरम्यान हार्मोन्स संतुलित (Hormonal Imbalance) ठेवणेदेखील खूप महत्वाचे आहे. कारण पीरियड्स दरम्यान हार्मोन्समध्ये खूप चढ-उतार होतात. ज्यामुळे अनेक वेळा पीरियड्समध्ये खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी तुम्ही बाहेरचे तळलेले पदार्थ जसे की फास्ट फूड किंवा जंक फूड, पॅक्ड फूड किंवा इतर जास्त मसालेदार पदार्थ टाळावेत. अशा वेळी तुम्ही दुग्धजन्य पदार्थही (Avoid Dairy Products) काळजीपूर्वक घ्यावेत. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण पीरियड्सच्या काळात पनीर किंवा क्रीम सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. कारण त्यामध्ये अॅराकिडोनिक अॅसिड असते. जे मासिक पाळीदरम्यान शरीरात भरपूर असते. त्यामुळे बार क्रॅम्प होऊ शकतात. . मासिक पाळीदरम्यान असा असावा आहार (Diet During Periods) हेल्थलाइननुसार, मासिक पाळीदरम्यान तुम्ही तुमचा आहार हलका ठेवावा. ज्यामध्ये फायबर आणि तेलकट सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. तिखट-मसालेदार अन्न पूर्णपणे टाळावे. मासिक पाळीच्या काळात जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करणेदेखील हानिकारक ठरू शकते.

  Mens Health: म्हणून पुरुषांनी लोणचं खायचं नसतं; प्रॉब्लेम होण्यापूर्वीत व्हा अलर्ट

  फळे आणि भाज्या (Fruits And Vegetables) कच्च्या भाज्या आणि फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. जे मासिक पाळी दरम्यान हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. बीटा कॅरोटीनसाठी गाजर, आंबा, रताळे इ. तर व्हिटॅमिन सी साठी तुम्ही ब्रोकोली, स्प्राउट्स आणि सर्व प्रकारची लिंबूवर्गीय फळे घेऊ शकता. संपूर्ण धान्य (Whole Grains) संपूर्ण धान्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे जास्त असतात. ज्यामुळे मासिक पाळीत अनेक पोषक तत्व मिळतात. जे मासिक पाळीदरम्यान त्रास कमी करण्यास मदत करते. डार्क चॉकलेट (Dark Chocolate) डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन उत्तेजित करतो. ज्यामुळे या काळात त्वरित मूड बदलू शकतो. सॅल्मन (Salmon) सॅल्मन हे मासिक पाळीच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे. ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडने समृद्ध असते. जे तुमच्या स्नायूंना वेदनापासून आराम देण्याचे काम करते. सॅल्मनमध्ये ओमेगा ३ अक्रोड, एवोकॅडो, भोपळा आणि अंबाडीच्या बिया असतात.

  डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार! अशी आहे योजना

  संत्री (Orange) संत्र्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, जे पीएमएसची लक्षणे दूर करण्यास सक्षम असतात. कॅल्शियमची उच्च पातळी वेदना कमी करून स्नायूंना आराम देण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Periods

  पुढील बातम्या