Home /News /lifestyle /

कोरोनामुळे डेंग्यूकडे करू नका दुर्लक्ष; 75 टक्के रुग्णांमध्ये दिसत नाहीत लक्षणं

कोरोनामुळे डेंग्यूकडे करू नका दुर्लक्ष; 75 टक्के रुग्णांमध्ये दिसत नाहीत लक्षणं

कोरोनाव्हायरसपासून (coronavoirus) बचाव करताना डेंग्यूपासून (dengu) बचावासाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय करा.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : सध्या प्रत्येक जण कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावाचा प्रयत्न करत आहे. मात्र या वातावरणात डोकं वर काढणाऱ्या डेंग्यू (dengu) हा आजाराकडे फारसं कुणी लक्ष देत नाही आहे. सामान्यतः एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यामुळे हा आजार पसरतो. पावसाळ्यात डेंग्यूची प्रकरणं अधिक पाहायला मिळतात. कारण  साचलेलं पाणी आणि घाण यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते आणि हा आजार मोठ्या प्रमाणात परसतो. डेंग्यूचा मुख्य प्रभाव हा फुफ्फुसं, यकृत आणि हृदयावर होत असतो. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच याची लक्षणं ओळखून त्यावर उपचार करणं. तसंच डेंग्यू होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणंही गरजेचं आहे. खूप ताप येणं, अति डोकेदुखी, डोळे दुखणं, शरीरातील स्नायूंमध्ये सांध्यांतील वेदना, मळमळ, उलट्या, स्नायू/ग्रंथी सुजणं, त्वचेवर पुरळ ही डेंग्यूची लक्षणं आहेत. मात्र सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शच्या मते, 75 टक्के रुग्णांमध्ये याची लक्षणं आढळून येत नाहीत. तर 20 टक्के रुग्णांमध्ये याची सर्वसाधारण लक्षणं आढळून येतात आणि फक्त 5 टक्के रुग्णांमध्ये सर्वाधिक लक्षणं दिसतात. त्यामुळे अनेकांना डेंग्यू झाला हे समजणारदेखील नाही.  त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय अशावेळी खूप महत्त्वाचे ठरतात. डेंग्यू होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल 1) मच्छरदाणी : घरात डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा. 2) क्रिम : क्रिम मलम लावूनदेखील स्वतःचे रक्षण करू शकता. शरीरावर संपूर्णपणे हे डासांपासून बचाव करणारं मलम लावू शकता. 3) पूर्ण बाह्यांचे कपडे : डासांपासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण बाही असणारे कपडे वापरावेत. हे वाचा - आता Bachelor पुरुष कोरोनाच्या टार्गेटवर; संशोधनात धक्कादायक माहिती समोर 4) घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा : आपल्या घरात आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा कारण घाणीत डेंग्यूचे डास वाढण्याची दाट शक्यता असते. 5) सूर्यास्तापूर्वी खिडक्या बंद करा : संध्याकाळ झाल्यानंतर डास घरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्यास्त व्हायच्या आधी खिडक्या आणि दरवाजे बंद करून घ्यावेत. 6) घराच्या आजूबाजूची भांडी स्वच्छ करा : डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाण पाणी आपल्या घरात कुठेही साचू देऊ नका. आपल्या घरातील माठ, कूलरमध्ये भरलेलं पाणी ठराविका काळानंतर बदलत रहा. जर या ठिकाणी पाणी साठलं असेल तर तिथे योग्य ती औषधं फवारा. हे वाचा - Global Handwashing Day: कोरोना काळात हात धूत राहणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या 7) कूलर आणि कचऱ्याचा डबा स्वच्छ ठेवा : यामध्ये पाणी साचून डास होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नेहमी या गोष्टी स्वच्छ ठेवा. 8) कापूर जाळा किंवा गुडनाईट लावा : संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्याने किंवा गुडनाईट लावल्याने डास कमी होण्यास मदत होईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health

    पुढील बातम्या