Home /News /lifestyle /

महिलेचे ब्रेस्ट पाहून डॉक्टरही शॉक; वैद्यकीय इतिहासात असे फक्त 200 रुग्ण

महिलेचे ब्रेस्ट पाहून डॉक्टरही शॉक; वैद्यकीय इतिहासात असे फक्त 200 रुग्ण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ब्रेस्टसंबंधित समस्येवर उपचारावर ही महिला यूएईहून भारतात आली होती.

    दिल्ली, 28 एप्रिल : बऱ्याच महिलांना ब्रेस्टसंबंधी समस्या असतात. अशीच समस्या असलेली यूएईमधील एक महिला भारतात उपचारासाठी आली. तिचे ब्रेस्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. तिला एक दुर्मिळ आजार झाला होता, ज्याची वैद्यकीय इतिहासात फक्त 200 केसेस असल्याचं सांगितलं जातं आहे. अशा आजारावरही भारतीय डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत आणि या महिलेची आजारातून सुटका केली आहे (UAE Woman breast surgery in Delhi). यूएईतील ही 60 वर्षांची महिला ब्रेस्टच्या समस्येशी गेली 30 वर्षे सामना करते आहे. तिच्या स्तनांचा आकार गरजेपेक्षा जास्त होता. त्यामुळे तिला चालायलाही त्रास होत होता. ब्रेस्ट घासले जात असल्याने तिला जखमाही झाल्या होत्या. कमर आणि मानेत वेदना व्हाययच्या. अखेर ती दिल्लीतील सर गंगाराम या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आली. तिथं तिची तपासणी केल्यानंतर तिला जेगेन्टोमेस्टिया (Gigantomastia) हा दुर्मिळ डिसॉर्डर असल्याचं समजतं. वैद्यकीय इतिहासात फक्त 200 प्रकरणांची नोंद आहे. हे वाचा - बाबो! एक हौस पूर्ण करण्याच्या नादात फु्ग्यासारखे फुगले महिलेचे ओठ; आता श्वास घेणंही मुश्किल झालं द प्रिंटच्या रिपोर्टनुसार सर गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर राजीव आहूजा म्हणाले, " रुग्णाची तपासणी केल्यानंतर मलाही धक्का बसला कारण तिच्या ब्रेस्टचा आकार खूप मोठा होता. याला जेगेन्टोमेस्टिया म्हटलं जातं. वैद्यकीत इतिहासात याची फक्त 200 प्रकरणं नोंदवली आहेत. या प्रकरणात रुग्णाचे ब्रेस्ट बेंबीच्याही खाली आले होते. गेल्या 40 वर्षांत मी मोठ्या ब्रेस्टसंबंधित बऱ्याच सर्जरी केल्या आहेत. पण हे प्रकरण खूप वेगळं होतं. इतक्या मोठ्या ब्रेस्टमुळे तिला बऱ्याच समस्या होत होत्या" सामान्यपणे अशा सर्जरीत स्तन कापून निम्मे केले जातात. यामुळे शरारीचा आकार बिघडण्याची भीती असते. त्यामुळे या महिलेच्या प्रकरणात पद्धत बदलण्यात आली. आजारापासून सुटका मिळण्यासह तिच्या शरीराचा आकारही खराब होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.  तिच्या ब्रेस्टचा आकार कमी करणंच नव्हे तर तिचा शारीरिक आकारही राखणं हे डॉक्टरांसमोरील आव्हान होतं. त्यामुळे तिच्यावर वेगळ्या पद्धतीने सर्जरी करण्यात आली. तिच्या डाव्या बाजूचं 1.3 किलो आणि उजव्या बाजूचं 1.4 किलो असं एकूण  2.7 किलो वजन कमी करण्यात आलं. हे वाचा - Chocolate मुळे नवं संकट! आता पसरतंय Bacterial Infection; WHO नेही केलं सावध महिलेवर साडेपाच तास सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर तीन दिवसांनी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं.  15 दिवसांत तिचे टाके हटवण्यात आले. 6 आठवडे तिला वजन उचलायला आणि हेव्ही एक्सरसाइझ करायला मनाई करण्यात आली होती.आता महिलेला कोणत्याच वेदना नाहीत. ती सामान्य आयुष्य जगू शकते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Woman

    पुढील बातम्या