मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! शेकडो माशांना पुरून उरला बदल; एका घासासाठी कसा भिडला पाहा VIDEO

OMG! शेकडो माशांना पुरून उरला बदल; एका घासासाठी कसा भिडला पाहा VIDEO

माशांच्या (fish) झुंडीतून घास हिसकावण्याची डेअरिंग एका बदकानं (duck) केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09  डिसेंबर : खाण्याच्या एका घासासाठी दोन प्राणी एकमेकांना भिडल्याचं आपण नेहमी पाहत आलो आहोत. मात्र जर कळपानं किंवा झुंडीनं एखाद्याचा घास हिसकावला तर कुणाचीही आपला घास परत आणण्याची हिंमत होणार नाही. मात्र एका बदकानं (duck) तशी हिंमत दाखवली. एका छोट्याशा घासासाठी तो माशांच्या (fish) झुंडीवर तुटून पडल. माशांच्या झुंडीतून तो घास हिसकावण्याची डेअरिंग त्यानं केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

ट्विटरवर बदक आणि माशांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. @Animalsandfools या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता  पाण्यात खूप सारे मासे आणि बदकही दिसत आहेत.

माशांना एक व्यक्ती खायला घालत आहे. तर दुसरीकडे बदकं ते पाहत आहेत. इतर बदक त्यावेळी शांत असतात. मात्र एका बदकाला काही हे पाहवत नाही. आपल्याला खायला मिळत नाही या माशांना खायला मिळत आहे हे त्याला पचनी पडलं नाही. कुणी आपल्या मदतीला येवो न येवो आपण आपला घास मिळवणारच असंच जणू या बदकानं ठरवलं आणि तो एकटा डेअरिंग करून माशांच्या झुंडीवर धावून गेला.

हे वाचा - Viral Video: मानवी वस्तीत शिरूनही पिकनिक मूडमधला असा वाघ तुम्ही कधी पाहिला नसेल!

मासे किनाऱ्यावर खाण्यासाठी आले. त्या व्यक्तीनं ब्रेडचा तुकडा टाकला. एका माशानं तो आपल्या तोंडात धरला आणि तो पुन्हा पाण्याच्या दिशेनं परतला. त्यावेळी त्याच्या सोबत असलेले मासे तो तुकडा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याआधीच बदक त्यांच्यावर ठाण मांडून बसलं होतं. त्या व्यक्तीनं माशांना एक ब्रेडचा तुकडा टाकताच, ते पाहून मासा तो तुकडा तोंडात घेण्याआधीच बदक माशांच्या दिशेनं भरभर पोहोत येऊन माशांवर उभं राहिलं होतं. ना त्या माशाला आणि इतर माशांना तो तुकडा खायची संधी त्यानं दिली. माशाच्या तोंडातील घास त्याला कळण्याआधीच बदकानं आपल्या चोचीत धरला आणि तो खाऊनही टाकला. मासे बिचारे तसंच पाहत राहिले.

First published:

Tags: Social media viral, Viral, Viral videos