Home /News /lifestyle /

दुबईच्या प्रिन्सनं शहामृगासोबत लावली शर्यत; VIDEO पाहून तुम्हीच सांगा विजेता कोण?

दुबईच्या प्रिन्सनं शहामृगासोबत लावली शर्यत; VIDEO पाहून तुम्हीच सांगा विजेता कोण?

दुबईच्या क्राऊन प्रिन्सचा (Dubai Crown Prince) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

दुबई, 04 जानेवारी :  शहामृग (ostrich) सर्वात वेगवान पक्षी. तो इतक्या वेगानं पळतो की त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही आणि अशाच शहामृगाशी दुबईच्या क्राऊन प्रिन्सनं चक्क शर्यत लावली आहे. सायकलवर स्वार होत त्यांनी शहामृगाच्या वेगाला मात देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (social media viral video) होतो आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स (Crown Prince) शेख हमदान बिन मोहमद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Hamdan Bin Rashid Al Makhtum) हे पक्षीप्रेमी असून, त्यांच्या पक्षीप्रेमाचे अनेक किस्से मशहूर आहेत. नुकताच त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामावर (Instagram) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत प्रिन्स चक्क सायकलवरून एका शहामृगाशी (Ostrich )शर्यत लावताना दिसत आहेत.
View this post on Instagram

A post shared by Fazza (@faz3)

बरेच अंतर प्रिन्स आपली सायकल त्या शहामृगाच्या वेगानं त्याच्या बरोबरीनं पळवताना दिसत आहेत. काही सेकंदासाठी प्रिन्स शहामृगाच्या पुढे जाताना दिसत आहेत, मात्र त्यानंतर ते शहामृग सायकलच्या पुढं जाऊन रस्ता पार करून दुसऱ्या दिशेला गेलेलं दिसत आहे. एका मिनिटाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तब्बल 4 लाख 25 हजार 549 लोकांनी हा बघितला आहे. एफएझेड 3 वरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हे वाचा - मुलीला पाहताच आईनं हसत सोडला जीव; कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा शेवटचा क्षण प्रिन्स शेख हमदान बिन मोहमद बिन राशिद अल मकतूम यांना पक्ष्यांची खूप आवड असून, त्यांच्या पक्षीप्रेमाची साक्ष देणारा एक फोटोही अलीकडेच प्रसिद्ध झाला होता. त्यालाही या व्हिडीओच्या निमित्तानं पुन्हा उजाळा मिळाला आहे. हा फोटो होता त्यांच्या मर्सिडीझ कारचा. एका पक्ष्यानं चक्क त्यांच्या मर्सिडीझ कारच्या विंडशिल्डवरच घरटं बनवलं होतं आणि त्यात अंडी घातली होती. हे बघितल्यानंतर प्रिन्सनी काही काळ ती कार वापरणे बंद केलं.जोपर्यंत त्या पक्ष्याची पिल्लं मोठी होऊन उडून जात नाहीत, तोपर्यंत त्या गाडीला कोणीही हात लावायचा नाही, इतकंच काय तर तिच्याजवळदेखील जायचं नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या स्टाफला आणि कुटुंबातील सदस्यांनाही दिली होती.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या