• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Skin care tips : चेहऱ्याची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवतील या खास गोष्टी; हिवाळ्यात मिळेल फायदा

Skin care tips : चेहऱ्याची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवतील या खास गोष्टी; हिवाळ्यात मिळेल फायदा

त्वचा तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हवेत आर्द्रता कमी असते, त्यामुळे त्वचा ड्राय होते. दुसरीकडे, थंडीबरोबरच आपले रोजचे पिण्याचे पाणीही कमी होते. यामुळे, त्वचेवरच नव्हे तर संपूर्ण शरीरात कोरडेपणा वाढतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : हवामानात बदल होतो तेव्हा बहुतांश लोकांची त्वचा कोरडी पडू लागते. त्वचा कोरडी (dry skin) झाल्यानंतर चेहऱ्यावरील क्रीम, लोशन सुद्धा उपयोगी येत नाहीत. हिवाळ्यात काही लोकांची त्वचा (skin health) खडबडीत होऊ लागते. थंडी वाढू लागल्यानंतर कोरडी होणारी त्वचा वाचवण्यसाठी आपण काही घरगुती बाबींचा वापर करू शकता. त्वचा तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात हवेत आर्द्रता कमी असते, त्यामुळे त्वचा ड्राय होते. दुसरीकडे, थंडीबरोबरच आपले रोजचे पिण्याचे पाणीही कमी होते. यामुळे, त्वचेवरच नव्हे तर संपूर्ण शरीरात कोरडेपणा वाढतो. कोरड्या त्वचेवरील उपचार पाणी शरीरात पाण्याची कमतरता हे कोरड्या त्वचेचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. हिवाळा आला की आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे समस्या आणखी वाढू शकते. खोबरेल तेल नारळाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. या तेलामध्ये इमोलिअंट गुणधर्म आढळतात. इमोलिअंट्स हा बेसाने बनलेला एक चिकट पदार्थ आहे. हे त्वचा गुळगुळीत आणि लवचिक बनवते. त्याच्या नियमित वापराने, त्वचा मऊ आणि मुलायम दिसते. हे वाचा - नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता देह व्यापार; तरुणींनी सांगितला भयावह अनुभव पेट्रोलियम जेली कोरड्या त्वचेसाठी पेट्रोलियम जेली हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे त्वचेवर वयाचा प्रभाव कमी होतो. पेट्रोलियम जेली हे खनिज तेल देखील मानले जाते. पेट्रोलियम जेली त्वचेवर संरक्षक ढाल बनवते. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि डागही कमी होऊ शकतात. थंड हवामानात जेली वापरण्याचा फायदा आहे. मध मध त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळते. याशिवाय ते त्वचेला आर्द्रता देते. मधात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि मुलायम बनवतात. त्वचेवर मध हलक्या हातांनी लावा आणि 10 मिनिटे मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही काळानंतर तुम्हाला फरक जाणवेल. आपण हे नियमितपणे देखील करू शकता. हे वाचा - EPFO सदस्यांसाठी महत्त्वाचे! तुम्हाला माहित आहेत का PF चे हे सहा मोठे फायदे? एवोकॅडो एवोकॅडो फळांमध्ये अधिक फॅटी अ‌ॅसिड असतात. हे फॅटी ऍसिड त्वचेच्या वरच्या थरातील अंतर भरून काढते. यासाठी तुम्ही अर्धा एवोकॅडो घ्या आणि त्याच्या लगद्याने चेहऱ्याला मसाज करा. मसाज केल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे कोरडेपणा दूर होईल आणि त्वचा मुलायम होईल.
  Published by:News18 Desk
  First published: