मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Dry Fruit Benefits : सुक्या मेव्याचे मिळतील जास्तीत जास्त फायदे, फक्त अशा पद्धतीने नियमित खा

Dry Fruit Benefits : सुक्या मेव्याचे मिळतील जास्तीत जास्त फायदे, फक्त अशा पद्धतीने नियमित खा

पण तुम्हाला माहित आहे का? सुक्या मेव्यांपैकी काही प्रकार असे आहेत जे एक विशिष्ट पद्धतीने खाल्यास त्याचा शरोराला जास्त प्रमाणात फायदा होतो.

पण तुम्हाला माहित आहे का? सुक्या मेव्यांपैकी काही प्रकार असे आहेत जे एक विशिष्ट पद्धतीने खाल्यास त्याचा शरोराला जास्त प्रमाणात फायदा होतो.

पण तुम्हाला माहित आहे का? सुक्या मेव्यांपैकी काही प्रकार असे आहेत जे एक विशिष्ट पद्धतीने खाल्यास त्याचा शरोराला जास्त प्रमाणात फायदा होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 फेब्रूवारी : सुका मेवा आपल्या शरोरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात, जे लठ्ठपणा आणि मधुमेहाशी लढण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंट्स कर्करोग आणि आतड्यांसंबंधी रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात. सुक्या मेव्यामध्ये पोषकतत्त्वे जास्त असल्याने ते कमी प्रमाणातही खाल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

सुक्या मेव्याचे फायदे अनेक आहेत आणि आपण त्याचे नियमित सेवन करतोदेखील. पण तुम्हाला माहित आहे का? सुक्या मेव्यांपैकी काही प्रकार असे आहेत जे एक विशिष्ट पद्धतीने खाल्यास त्याचा शरोराला जास्त प्रमाणात फायदा होतो. सुक्या मेव्यांमधी काही प्रकार रात्रभर पाण्यात किंवा भिजवून खाल्यास आपल्या शरीराला खूप जास्त फायदा होतो.

Coffee Day : रोज या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात अनेक फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

हे सुके मेवे खावे भिजवून, मिळेल जास्त फायदा

बदाम

E Times ने दिलेल्या माहितीनुसार, बदामामध्ये व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेल असते. बदाम त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासोबतच हृदयही निरोगी ठेवण्यास मदत करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? बदामाचे जास्त फायदे केव्हा मिळतात. बदामाचे अधिक फायदा मिळवण्यासाठी बदाम रात्रभर किंवा 6-8 तास पाण्यात भिजवून खावे.

अक्रोड

अक्रोड बुद्धी शार्प करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. या ड्रायफ्रूटमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे तुम्ही अक्रोड पाण्यात किंवा दुधामध्ये भिजवून खाल्ले तर तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदा होतो. यामुळे तुमच्या मेंदूवरील तणावदेखील कमी होण्यास मदत होऊ शकते.

मनुका

जर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही मनुके भिजवून खावे. मनुक्याचे गुणधर्म उष्ण असतात आणि तुम्ही ते रात्री भिजवून सकाळी खाल्यास ते तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

अंजीर

अंजीर फायबरने समृद्ध असतात. यात फॅट्स नसतात, कोलेस्टेरॉल नसते आणि यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाणातदेखील संतुलित असते. यामुळे अंजीर हे सर्वात फायदेशीर ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. मात्र अंजीरदेखील भिजवून खाल्यास तुम्हाला याचा जास्त फायदा होतो. पीसीओएसचा सामना करणाऱ्यांनी अंजीर भिजवूनच खावे.

तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा..

पेंडखजूर

पेंडखजूर हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. यात मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. त्याचसोबत यामध्ये असणारे पोटॅशियम व्यक्तीची मज्जासंस्था सुधारते. भिजवलेले खजूर खाल्यास ते हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करतात आणि आतड्यांसंबंधी हालचालीदेखील सुधारतात.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle