मॉस्को, 12 डिसेंबर : आपण प्राण्यांची अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतो. त्यांना कुरवाळतो, नाचवतो, त्यांना किसही करतो. पण कधी कधी प्राण्यांची अशी घेतलेली किस चांगलीच महागात पडते. याचा अनुभव घेतला तो रशियातील (Russia) 25 वर्षीय तरुणाला. घोड्याशी (Horse) केलेली मस्ती चांगलीच भोवली. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने चक्क घोडयाचाच किस (kissing horse) घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या घोड्यानं याच्याच नाकाचा चावा घेतला.
पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, वासिली (Vasily) नाव असलेला हा तरुण दारू पिऊन शहरातील एका बारमधून बाहेर पडला आणि घोड्यांवरून जाणाऱ्या दोन मुलींना धडकला. त्यानं घोड्यावर बसलेल्या एका मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला ढकलून दिलं तेव्हा त्या तरुणानं आपला मोर्चा घोड्याकडे वळवला. तो घोड्याच्या पाठीवर थापा मारायला लागला आणि नंतर तो घोड्याला किस करायला गेला. त्या मुली त्याला सांगत होत्या की, घोड्याच्या तोंडापुढं उभा राहू नको, त्याला आवडत नाही. घोडयाला धोकादायक वाटलं तर तो चावा घेईल, असा इशाराही त्या मुलींनी वासिली आणि त्याच्या ग्रुपला दिला. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. शेवटी व्हायचं तेच झालं. घोड्यानं वासिलीच्या नाकाचा चावा घेतला.
वासिलीला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी लगेचच चावा घेतलेला भाग शिवून टाकला आणि वासिलीचं नाक वाचलं, पण अनेक टाके असल्यानं जखमेचे व्रण दिसतील असे डॉक्टरांनी सांगितलं. स्थानिक बाझा टेलिग्राम (Baza Telegram channel) या ऑनलाइन चॅनेलवर वासिलीच्या नाकाच्या ग्राफिक इमेजेस पोस्ट करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम वासिलीने नाकारला असून, आपण दारू अगदी कमी प्रमाणात घेतलेली होती, पूर्ण नशेत नव्हतो, असं त्यानं म्हटलं आहे. घोडयाचा किस घेण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यानं नाकारलं आहे.
वासिलीनं सांगितलं की, मी थोडी दारू घेतली होती हे खरं आहे, पण घोड्याचा किस घेण्यासाठी कधीच जाणार नाही, कारण ते धोकादायक आहे हे मला माहीत आहे. मी घोड्याला गाजर खायला देत होतो अचानक तो पुढे झाला आणि त्यानं माझ्या नाकाचा चावा घेतला.’
घोडेस्वार मुलीला विचारलं असता ती म्हणाली, आम्ही त्या तरुणांना घोड्यापासून लांब राहायला सांगितलं होतं. ही घटना घडल्यानंतरही आम्ही त्यांना मदत देऊ केली होती. घोडा कशामुळे आक्रमक झाला, हे कळलं नाही.
हे वाचा - मित्र असावा तर असा! संकटात सापडलेल्या ट्रॅक्टर चालकाची हत्तीनं केली मदत, पाहा भावुक करणार VIDEO
प्राणी मानसशास्त्रज्ञ (Zoo Psychologist) आणि घोड्यांच्या मालक असणाऱ्या अॅना गोन्चारोवा (Anna Goncharova) म्हणाल्या, घोड्यांना दारू प्यायलेली माणसे आवडत नाहीत. केवळ दारूचा वास आला म्हणून नव्हे तर त्या माणसाने केलेल्या कृत्यांमुळे घोड्याला त्याच्यावर हल्ला होण्याची भीती वाटली म्हणून त्यानं त्या माणसाच्या नाकाचा चावा घेतला.