Home /News /lifestyle /

गरम पाणी पिणं, गरम पाण्याची अंघोळ; यामुळे खरंच कोरोनापासून बचाव होतो?

गरम पाणी पिणं, गरम पाण्याची अंघोळ; यामुळे खरंच कोरोनापासून बचाव होतो?

जेवल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.

जेवल्यानंतर चहा प्यायची सवय असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.

कोरोनाव्हायरसविरोधात गरम पाणी (Hot water for pervention from coronavirus) किती प्रभावी आहे, याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे.

    मुंबई, 08 मे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये संक्रणाचा वेगही तीव्र (The transition speed is intenseआहे. त्यामुळे कोरोना होऊ नये म्हणून काय करावं? हाच विचार प्रत्येक व्यक्ती करत आहे. अशात कोरोना होऊ नये साठी काय काळजी घ्यायची याच्या काही गाईडलाईन सरकारनेही सांगितलेल्या (Guidelines by Government) आहेत. मास्क लावा, हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, कामाशिवाय घराबाहेर जाऊ नका, या सूचना केल्या जात आहेत. तर कोरोना काळात इम्युनिटी वाढावी यासाठी काय करावं हेदेखील सांगितलं जात. कोरोना काळात आहारात काय काय घ्यावं? याचीही बरीच चर्चा होते. तशीच चर्चा गरम पाणी पिण्याबद्दलही होत आहे. गरम पाणी प्या, वाफ घ्या, घरगुती उपचार कसे  करायचे हे सांगणारेही कमी नाहीत. WHO ने यातले अनेक उपाय फायदेशीर नाही तर, नुकसानदायक असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता केंद्र सरकारनेदेखील गरम पाणी पिण्याने कोरोना काळात काही फायदा होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. Mygovindia ने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासून चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी (Hot Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. काही आजारांमध्ये त्याचा फायदाही होतो. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी गरम पाणी उपयोगाचं नाही. उलट जास्त गरम पाणी पिण्याने आणि अशा पाण्याने अंघोळ केल्याने गंभीर दुष्परिणाम होतील, (इम्युनिटी वाढवण्यासाठी किती दिवस घ्यायचं Vitamin?; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला) 1) गरम पाणी प्यायल्याने किडनीवर परिणाम होतो. किडनीचं कार्य बिघडतं. 2) काही लोक तहान लागलेली नसताना गरम पाणी पितात. त्यामुळे नसांना सुज येते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. 3) कहीजण तर कोरोनापासून बचावासाठी गरम पाण्याने आंघोळ करतात. जास्त करम पाण्याने त्वचा भाजते. अॅलर्जीही होऊ शकते. 4) गरम पाण्याने त्वचा शुष्क आणि कोरडी होते. (हा काय घोळ? Corona Vaccine न घेताच मिळालं डोस पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट) 5) शरीराच्या आतल्या भागांचे टिश्यू फार संवेदनशील असतात. त्यांना आतमध्ये इजा हाउ शकते. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातल्या भागांना नुकसान पोहचतं. गरम पाण्याने पोटात जळजळ होते 6) गरम पाणी शरीरातील रक्त प्रवाहावर वाईट परिणाम करतं. रक्त संचरणावर दबाव पडल्याने ब्लड प्रेशर वाढणे आणि कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो. कोरोना काळात गरम पाणी पिण्याबद्दल जी माहिती समोर आलेली आहे त्यात काही तथ्यं नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विनाकारण गरम पाण्याचं सेवन करू नका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या