Home /News /lifestyle /

तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर फक्त करा एक छोटंसं काम; आरोग्यावर होणार नाही दुष्परिणाम

तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर फक्त करा एक छोटंसं काम; आरोग्यावर होणार नाही दुष्परिणाम

तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची (cholesterol) पातळी वाढते. शिवाय आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. मात्र तुम्हाला तळलेले पदार्थ (oily food) आवडत असतील तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुमच्यासाठी ही उपयुक्त अशी माहिती आहे.

पुढे वाचा ...
  • myupchar
  • Last Updated :
    उच्च कोलेस्टेरॉलची (cholesterol) समस्या तेलकट खाद्यपदार्थ (oily food) आणि जंकफूडच्या (junk food) जास्त सेवनामुळे होते. कोलेस्टेरॉल हा शरीराच्या सर्व पेशींमध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. मेंदू आणि मज्जासंस्था पूर्णपणे कोलेस्टेरॉलवर अवलंबून असतात. उच्च कोलेस्टेरॉल असल्यावर अति चरबीयुक्त पदार्थ खाण्यामुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची घट होते. कोलेस्टेरॉलच्या चांगल्या पातळीत घट झाल्यामुळे ते रक्तवाहिन्या गोठतात आणि रक्ताचा प्रवाहात अडथळा होतो. यामुळे हृदय आणि मेंदूच्या समस्यांचा धोका वाढतो. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली यांनी सांगितलं, उच्च कोलेस्टेरॉलचं संतुलन राखण्यासाठी चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाणं टाळणं महत्त्वाचं आहे. जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. या व्यतिरिक्त ज्या तेलात खाद्यपदार्थ तळले जातात ते बऱ्याचदा आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यावेळी मोठ्या उत्साहाने तुम्ही तेलकट पदार्थ खाल पण त्यानंतर होणारा कोलेस्टेरॉलचा त्रास टाळण्यासाठी एक उपाय आहे. myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, जर तुम्ही जास्त तेलकट खाल्लं असेल तर त्यानंतर एक किंवा दोन ग्लास गरम पाणी प्या. असं केल्याने तेलकट अन्न शरीरातून सहज काढता येईल. यामुळे आतड्या, यकृत आणि पोट निरोगी राहिल आणि तेलामुळे होणारे नुकसान टाळलं जाईल. कोलेस्ट्रॉलसाठी कोमट पाणी आणि मध यांचं मिश्रण चांगलं आहे आणि यामुळे हृदयरोग बरा होतो. तसंच उच्च रक्तदाब समस्येवर मात करण्यास मदत होते. तेलकट अन्न खाल्ल्यानंतर कोणत्याही थंड गोष्टी खाऊ नयेत याची काळजी घ्या कारण त्याचा यकृत, पोट आणि आतड्यांवर विपरित परिणाम होतो. हे वाचा - हळदीइतकंच गुणकारी आहे हे तेल; त्वचेच्या समस्या होतील दूर, सौंदर्यही खुलवेल याखेरीज जर तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर थोड्या फेऱ्या मारा. हे अतिरिक्त कर्बोदक जाळण्यास मदत करेल. आयुर्वेदानुसार तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर मध सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय दिवसात दोन ते तीन वेळा मधासह दोन चिमूटभर काळी मिरी पावडर वापरली जाऊ शकते. ऑलिव्ह किंवा सूर्यफुलाचे तेल वापरा जर तळलेले पदार्थ आवडत असतील तर तळण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूलाचे तेल वापरा. ऑलिव्ह ऑईल आणि सूर्यफूलाच्या तेलात तळलेले पदार्थ हानिकारक नसल्याचं संशोधनातून दिसून आले आहे. जे लोक वयाने मोठे आहेत किंवा वजन जास्त आहेत त्यांनी उच्च कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी हे उपाय केले पाहिजेत. गरम पाणी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर मुलांना सुरुवातीपासूनच याची सवय झाली असेल तर ती मोठी झाल्यावर देखील निरोगी राहतील. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख आरोग्यदायी आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या