थर्माकॉलच्या कपात चहा पिताय; मग होऊ शकतो ‘हा’ आजार

चहाच्या टपरीवर जाऊन मित्र- मैत्रीणींसोबत गप्पा मारणं, ऑफिसमधल्या राजकारणावर बोलणं अशा एक ना अनेक गोष्टी या एक कप चहाभोवती फिरत असतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:26 PM IST

थर्माकॉलच्या कपात चहा पिताय; मग होऊ शकतो ‘हा’ आजार

मुंबई: उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा... प्रत्येक ऋतूत अनेकांची दिवसाची सुरुवात चहानेच होते. यानंतर दिवसभरात चहा प्रेमींचे किती चहा होतात याबद्दल तर कोणी विचारच करत नाही. या चहाभोवतीच घरातले व्यवहार आणि ऑफिसमधलं राजकारण फिरत असतं. चहाच्या टपरीवर जाऊन मित्र- मैत्रीणींसोबत गप्पा मारणं, ऑफिसमधल्या राजकारणावर बोलणं अशा एक ना अनेक गोष्टी या एक कप चहाभोवती फिरत असतात. पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की तुम्ही ज्या कपमध्ये चहा पिता तो थर्माकॉलचा तर नाही ना... कारण थर्माकॉलच्या कपमधून चहा पिणं हे शरीरासाठी फार त्रासदायक ठरणारं आहे.

हे थर्माकॉलचे कप पॉलिस्टीरीनने बनवलेले असतात, जे शरीरासाठी अतिशय धोकादायक असतात. थर्माकॉलच्या कपात जेव्हा आपण गरम उकळता चहा घेतो तेव्हा पॉलिस्टीरीनचे काही तत्त्व चहात मिसळतात आणि ते शरीरात जातात. अनेकदा यामुळे कर्करोगही होऊ शकतो. या तत्वामुळे थकणं, लक्ष कमी लागणं आणि हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं.

जर तुम्ही दररोज थर्माकॉलच्या कपमध्ये चहा पीत असाल तर त्वचेचे आजारही होऊ शकतात. त्वचेवर लाल रंगाचे चटके येतात तसेच घशात खवखव तर होतेच शिवाय घसा दुखू लागण्याची लक्षणंही दिसतात. थर्माकॉलच्या कपचा दररोज वापर केला तर पोटाशी संबंधित विकारही होऊ शकतात. जेव्हा थर्माकॉलच्या कपात चहा टाकला जातो तेव्हा कपाच्या भोवती असलेले जीवाणू आणि बॅक्टेरिया चहात मिसळून जातात.

डॉक्टरांच्या मते, थर्माकॉलच्या या कपांवर कृत्रिम मेणाचा एक थर लावण्यात आलेला असतो. या थरामुळेच कपाला गळती लागत नाही. त्यामुळे यातून चहा पिताना कपाला लावलेलं वॅक्सही पोटात जातं. यामुळे आतड्यांना याचा प्रादुर्भाव होऊन, पचनक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो.

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...