25 जानेवारी : सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात होते, ती चहा किंवा कॉफीने... चहा-कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आपल्यात एक ऊर्जा येते आणि दिवसभराच्या कामासाठी आपण तयार होतो.... चहा-कॉफी प्यायल्याने दिवसाची सुरुवात चांगली होत असली, तरी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, वजन वाढू शकतं. मग आता तुम्ही विचाराल की सकाळी चहा-कॉफी नाही तर नेमकं प्यायचं काय? याचं उत्तर आहे जिऱ्याचं पाणी.
सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी का प्यावं?
जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल
जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात
ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात
कसं तयार कराल जिऱ्याचं पाणी?
एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा
शक्यतो तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा
सकाळी हे पाणी गाळून प्या
जिऱ्याचं पाणी हे लाईट ड्रिंक आहे, त्यामुळे चहा-कॉफीऐवजी सकाळी हे पाणी प्यायल्यात तर तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभर तुम्ही अॅक्टिव्ह राहाल.
सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
अन्य बातम्या
अन्य बातम्या
बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान पण...
तुम्ही रिकाम्या पोटी कॉफी घेता का? जाणून घ्या काय आहेत परिणाम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.