तुम्हाला गरम चहा पिण्याची सवय आहे का? होऊ शकतो हा आजार!

तुम्हाला गरम चहा पिण्याची सवय आहे का? होऊ शकतो हा आजार!

तुम्हाला गरम चहा पिण्याची सवय आहे का? जर तुम्ही रोज गरम चहा पित असाल तर सावधान!

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च: भारतात अगदी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांची सकाळ होते ती अगदी गरमा गरम चहानं.अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री जेवणापर्यंत वाफाळता गरम चहा पिण्याची सवय आपल्याला असते. काहींची सकाळ तर बेड टी घेतल्याशिवाय होत नाही.

ऑफिस, कॉलेजच्या वेळात मधल्या ब्रेकमध्ये किंवा तरतरी यावी यासाठी वाफाळता चहा वेळी अवेळी आपण घेत असतो, मात्र हाच चहा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हा विचारही आपण करत नाही.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका संशोधनातून हे समोर आलं आहे की वाफाळता किंवा अति गरम चहा प्यायल्यानं आपल्या ग्रंथनलिकेचा (इसोफॅगसचा) कर्करोग होऊ शकतो. ४० ते ७५ वर्षांच्या वयोगटाचा समावेश असलेल्या ५० हजार लोकांवर हे संशोधन करण्यात आलं. त्या संशोधनानुसार ६० डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक गरम चहा करुन पिणाऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका ९० टक्के इतका आहे. याशिवाय अति चहा पिण्यानं शरीरातील पित्ताचं प्रमाणही वाढतं त्यामुळे वाफाळता चहा जीवघेणा ठरणार नाही याची काळजी घ्या.

VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

First published: March 26, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading