Home /News /lifestyle /

रात्री शांत झोपेसाठी दुधाचा हा आहे खूप फायदा; आता संशोधनातूनही झालं सिद्ध

रात्री शांत झोपेसाठी दुधाचा हा आहे खूप फायदा; आता संशोधनातूनही झालं सिद्ध

Hot Milk For Good Sleep: तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायले तर तुमचे पोट रात्रभर भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. यामुळं रात्री भूक लागल्यानं झोपमोड होत नाही आणि तुम्ही आरामात झोपू शकता.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : आपल्या देशात बऱ्याच काळापासून रात्री गरम दूध (Hot Milk/Warm Milk)  पिऊन झोपणं फायदेशीर मानलं जातं. यामुळं दिवसभराचा थकवा दूर होतो आणि चांगली (Hot Milk For Good Sleep) झोपही येते, असं म्हटलं जातं. आता अमेरिकन शास्त्रज्ञांनीही त्यांच्या एका अभ्यासात याला दुजोरा दिला आहे. दुधात ट्रिप्टोफॅन (Tryptophan) हे तत्त्व आढळतं, ज्यामुळं झोप वाढते. दैनिक जागरण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ट्रिप्टोफॅन हे दुधात आढळणारं एक अमीनो आम्ल आहे. हे प्रथिनांचं जैवसंश्लेषण करतं. दुधातील अमीनो अ‌ॅसिडच्या विखंडनामुळं (Fragmentation) तयार झालेल्या प्रथिनांच्या तुकड्यांना (peptides - पेप्टाइड्स) केसिन म्हणतात. CTH म्हणजेच Casein Tryptic Hydrolyzate ताण-तणाव दूर करतं आणि झोप सुधारते. अमेरिकन केमिकल सोसायटी (ACS) च्या जर्नल ऑफ अॅग्रीकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार CTH मध्ये पेप्टाइड्सचा शोध लागला आहे. यामुळे भविष्यात नैसर्गिक झोपेसाठी नवीन उपचारांचा शोध लागेल. निरोगी राहण्यासाठी दूध प्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ऑफ अमेरिकानुसार (Centers for Disease Control and Prevention), अमेरिकन प्रौढांपैकी एक तृतीयांश व्यक्तींना निद्रानाशाची (insomnia)  समस्या आहे. निद्रानाशाच्या या आजारासाठी, डॉक्टर बऱ्याचदा या लोकांना बेंझोडायझेपाईन्स (Benzodiazepines)  आणि झोलपिडेमसारखे (Zolpidem) सेडेटिव (Sedative) घेण्यास सांगतात. पण या औषधांचा साईड इफेक्टही होतो. लोकांना या औषधांचं व्यसनदेखील लागू शकतं. अशा अनेक औषधांचा मेंदूच्या नसांवरही वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणं चांगल्या झोपेसह आरोग्यासाठीदेखील चांगलं आहे. याशिवाय, दुधात कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळतं, जे हाडांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. हे वाचा - Success Story : MBA चं काय जमेना म्हणून चहाचा स्टॉल चालू केला; 22 वर्षीय तरुण आहे आता करोडपती रात्री दूध पिण्याचे फायदे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायले तर तुमचे पोट रात्रभर भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. यामुळं रात्री भूक लागल्यानं झोपमोड होत नाही आणि तुम्ही आरामात झोपू शकता. आयुर्वेदानुसार रात्री कोमट दूध प्यायल्यानं मन शांत राहतं आणि शरीराच्या स्नायूंनाही आराम मिळतो. त्यामुळं झोप चांगली येते. हे वाचा - मिरवणुकीत घुसली गांजा भरलेली कार, पाल्यापाचोळ्याप्रमाणे उडाले लोक; चौघांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO रात्री दूध पिण्याचे काय आहेत तोटे ज्या लोकांना लॅक्टो इनटॉलरन्सची समस्या आहे, त्यांनी रात्री दूध पिणं पूर्णपणे टाळावं. तसंच, ज्यांना इन्सुलिनची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच रात्री दुधाचं सेवन करावं. कारण जर तुम्ही रात्री दूध पित असाल तर तुमच्या इन्सुलिनची पातळी वाढू शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या