दररोज चहा प्यायल्याने नुकसान नाही तर होतात अनेक फायदे

दररोज चहा प्यायल्याने नुकसान नाही तर होतात अनेक फायदे

चहा पीणं आरोग्यासाठी चांगलं नाही.. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या होते... असे एक ना अनेक उपदेश तुम्हाला आतापर्यंत मिळाले असतील.

  • Share this:

चहा पीणं आरोग्यासाठी चांगलं नाही.. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या होते... असे एक ना अनेक उपदेश तुम्हाला आतापर्यंत मिळाले असतील. लोकांचे एवढे टोमणे ऐकल्यावर चहा पीणं खरंच एवढं धोकादायक आहे का असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात मात्र काही वेगळंच समोर आलं. संशोधनानुसार, रोज जे चहा पित नाहीत त्यांच्यापेक्षा नियमित चहा पिणाऱ्यांचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने (Brain Functioning) काम करतो.

नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुरमधील सहाय्यक प्राध्यापक फेंग ली म्हणाले की, 'आम्ही केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षात तर हेच समोर आलं की, चहा पिण्याचा आपल्या मेंदूवर सकारात्मक परीणाम होतो. नियमितपणे चहा प्यायल्याने मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि सुरक्षात्मक कवच तयार होतं.' याआधीच्या संशोधकांनीही सांगितले की, चहा पीणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याशिवाय व्यक्तिच्या मूडवरही याचा सकारात्मक परिणाम होतो. हृदय रोगाशी संबंधीत अनेक रोगांवर नियंत्रण राहतं.

नवीन संशोधन हे 2015 पासून 2018 दरम्यान करण्यात आलं होतं. या संशोधनात रिसर्च टीमने 60 वर्षांच्या 36 लोकांचं राहणीमान, त्यांचा आहार, त्यांची मानसिक स्थिती याची माहिती मिळवली. संशोधनात हे सिद्ध झालं की, 25 वर्ष आठवड्याला किमान चारवेळा ग्रीन टी, उलोंग चहा किंवा काळा चहा पिणाऱ्या व्यक्तिंचा मेंदू अधिक तल्लख होता.

श्रद्धा कपूर एग्झायटी आजाराने त्रस्त; नक्की हा आजार असतो तरी काय, इथे घ्या जाणून

या घरगुती उपायांनी काही दिवसांमध्ये पायाच्या भेगा होतील दूर

Loading...

तुम्ही सतत सकाळचा नाश्ता चुकवता का.. तर हे एकदा वाचाच!

हे वाचल्यावर तुम्ही कधीही उभं राहून जेवण्याचा विचार करणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...