मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Bottle Gourd: दुधी भोपळ्याचा ज्युस पिण्याचे आहेत अनेक फायदे; कधी आणि किती प्यावा हे समजून घ्या

Bottle Gourd: दुधी भोपळ्याचा ज्युस पिण्याचे आहेत अनेक फायदे; कधी आणि किती प्यावा हे समजून घ्या

दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. दुधी भोपळ्याचा ज्युस प्यायल्याने मिळणारे फायदे जाणून घेऊया.

दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. दुधी भोपळ्याचा ज्युस प्यायल्याने मिळणारे फायदे जाणून घेऊया.

दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. दुधी भोपळ्याचा ज्युस प्यायल्याने मिळणारे फायदे जाणून घेऊया.

  मुंबई, 14 जुलै : दुधी भोपळा (Bottle Gourd) अनेकांना आवडत नाही. घरात दुधीभोपळ्याची भाजी असेल तर बरेच जण नाकं मुरडतात; पण या अनेकांच्या नावडत्या दुधीभोपळ्याच्या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असतं. दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला दुधीभोपळा आवडत नसेल तर तुम्ही त्याचा ज्युस करून त्याचं सेवन करू शकता. तर, दुधीचा ज्युस केव्हा प्यावा आणि तो किती प्रमाणात प्यावा, याबद्दल जाणून घ्या.

  ज्युस पिण्याची योग्य वेळ कोणती?

  दुधीचा रस (Bottle Gourd Juice) म्हणजेच ज्युस पिण्याची उत्तम वेळ सकाळची असते. तुम्ही झोपेतून उठून रिकाम्यापोटी हा ज्युस प्यायलात तर तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. यामुळे दिवसभर शरीराला शक्ती मिळते. इतर ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात दुधीच्या रसाच्या सेवनाचा खूप फायदा होतो. या ज्युसमुळे शरीर डिटॉक्स (Detox) होतं, म्हणजेच शरीरातून सर्व प्रकारची विषारी द्रव्यं बाहेर पडतात. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

  दुधीचा ज्युस किती प्रमाणात प्यावा?

  आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक ग्लास दुधीचा ज्युस पिणं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त ज्युस पिण्याची गरज नाही. या ज्युसचं अतिरिक्त सेवनही शरीरासाठी योग्य नसल्याचं ते म्हणतात.

  हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

  दुधीचा ज्युस पिण्याचे फायदे

  दुधीच्या रसामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच उच्च रक्तदाबाच्या (High BP) रुग्णांसाठी दुधी औषधाप्रमाणे आहे. या ज्युसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधीचा ज्युस (Bottle gourd) देखील अत्यंत गुणकारी ठरू शकतो. दुधीचा ज्युस प्यायल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रणात राहते आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

  हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

  तुम्ही रक्तातील वाढलेल्या साखरेसोबतच वाढलेल्या वजनामुळेदेखील त्रस्त असाल तर अशा स्थितीत तुमच्यासाठी दुधीचा ज्युस अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येतही तुम्हाला फायदा होऊ शकतो. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. केसांची वाढ चांगली होऊन केस अकाली पांढरे होत नाहीत. तर मग आता तुम्ही दुधीची भाजी किंवा ज्युस पिण्याबद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकाल अशी आशा करूया.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips