Home /News /lifestyle /

दारू प्यायल्याने झोपेवर होतो परिणाम, पडतात विचित्र स्वप्नं? तज्ज्ञांनी केला खळबळजनक दावा

दारू प्यायल्याने झोपेवर होतो परिणाम, पडतात विचित्र स्वप्नं? तज्ज्ञांनी केला खळबळजनक दावा

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीचा विचार केल्यास, असं लक्षात येतं, की दारू प्यायल्यानं झोपेवर चांगला नाही तर वाईट परिणाम होतो.

    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : आपल्या आजूबाजूला असणारे अनेक जण दारू पितात. काही जण हौस म्हणून दारू पितात, तर काही जणांना दारूची (Alcohol) इतकी सवय लागलेली असते, की तिच्याशिवाय त्यांना अस्वस्थ वाटतं. रात्री झोप (Sleep) येत नसेल तर दारू प्यायल्यास चांगली झोप येईल, असा अनेकांचा समज आहे. काही जणांना दारू प्यायल्यानंतरच शांतपणे झोप लागते, असंही म्हटलं जातं; मात्र या विविध दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याचादेखील विचार केला पाहिजे. अल्कोहोल आणि चांगली झोप (Alcohol Cause Poor Sleep and Nightmares) यांचा खरोखर थेट संबंध आहे का, याबाबत अलीकडेच काही तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या मते दारू आणि झोप यांचा थेट संबंध (Alcohol and Sleep Relation) आहे; मात्र जसा सर्वांचा समज आहे तसा तो संबंध चांगला नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तींना खूप आणि विचित्र स्वप्नं पडतात. 'ओटी' (OTTY) या मॅट्रेस कंपनीतल्या (Mattress Company) स्लीप एक्स्पर्ट्सनी (Sleep Experts) मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या झोपेच्या संदर्भात सर्वांना आश्चर्यचकित करणारा दावा केला आहे. जेव्हा रात्री जास्त दारू प्यायलेली असते, तेव्हा त्या व्यक्तीला अजिबात शांत झोप लागत नाही. झोपेची गुणवत्ता खूपच खराब होते, अशी माहिती कंपनीतल्या तज्ज्ञांनी 'द सन' वेबसाइटशी बोलताना दिली. वाचा : सर्वजण लसवंत होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, Gavi च्या प्रमुखांनी गरीब देशांमधील लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता दारू सोडल्यानंतरही स्वप्नं राहतात लक्षात एखादी व्यक्ती दारू पीत असते तेव्हा तिच्या रक्तामध्ये अल्कोहोलची पातळी (Blood Alcohol Level) वाढलेली असते. जेव्हा दारू पिणं बंद होतं तेव्हा रक्तातली अल्कोहोलची पातळीही कमी होते. याचा परिणाम झोपेवर होतो. अल्कोहोलचं प्रमाण कमी झाल्याने झोप कमजोर होते. आजूबाजूला होणारी थोडीशी हालचालही तुम्हाला झोपेतून जागं करू शकते; मात्र अशा व्यक्तींना झोपेच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचताच स्वप्नं (Dreams) पडू लागतात. झोपेतून उठल्यावरही त्यांना त्यांची स्वप्नं जशीच्या तशी आठवतात, असं स्लिप एक्सपर्ट्सचं मत आहे. वाचा : Cleopatra | अशा मसाल्याचे तेल जे इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री क्लियोपेट्रा वापरत होती! दारूचं प्रमाण जास्त झाल्यास पडतात वाईट स्वप्नं स्लिप एक्सपर्ट्सच्या मते, जेव्हा शरीरात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं तेव्हा व्यक्तीची झोप कमी होते. अशा व्यक्तीला पडणारी स्वप्नं वाईट असतात आणि रात्री पडलेली स्वप्नं सकाळी शक्यतो आठवत नाहीत. दारू प्यायल्यावर व्यक्तीच्या मेंदूमध्ये आजूबाजूच्या गोष्टी कोरल्या जातात; मात्र नशेमुळं त्या काहीशा पुसट असतात. परिणामी स्वप्नंही तशीच पडतात. तज्ज्ञांनी असंही सांगितलं, की एखादी व्यक्ती इमोशनल ड्रिंकर (Emotional Drinker) असेल, म्हणजेच, दुःखावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी दारू पीत असेल, तर त्याचं दु:ख स्वप्नामध्ये आणखी व्यापक आणि भयानक रूप धारण करू शकतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीचा विचार केल्यास, असं लक्षात येतं, की दारू प्यायल्यानं झोपेवर चांगला नाही तर वाईट परिणाम होतो.
    First published:

    Tags: Alcohol, Health Tips

    पुढील बातम्या