मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे नेमकं किती? तुमच्या शरीराची पाण्याची गरज कशी मोजायची?

भरपूर पाणी प्यावं, पण म्हणजे नेमकं किती? तुमच्या शरीराची पाण्याची गरज कशी मोजायची?

प्रत्येकाच्या शरीराला पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते. पाणी भरपूर प्यावं असं सांगितलं जातं. पण तुमच्या शरीराची पाण्याची गरज तुमच्या वजनानुसार ठरते. किती पाणी प्यावं याचा तज्ज्ञांनी सांगितलेला सोपा फॉर्म्युला.

 • myupchar
 • Last Updated :
  एखाद्या 45 किलो व्यक्तीला दररोज 85 किलो व्यक्तीला आवश्यक असेल इतकं पाणी पिण्याची गरज आहे का? वजनानुसार पाण्याची गरज मोजताना दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यावं लागतं आणि हे निरोगी राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुरेसं पाणी न प्यायल्याने बर्‍याच आजारांना निमंत्रण दिलं जाऊ शकतं. दिवसभरात एखाद्या माणसाने किती पाणी प्यावं याचा लोकांना नेहमीच पेच पडतो. साधारणपणे असं म्हणतात की दररोज 2 लिटर पाणी प्यावे. दररोज योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे चयापचय वाढतं आणि भूक देखील नियंत्रित होते. myupchar.com चा डॉ. मेधावी अग्रवाल म्हणतात की, शरीराच्या वजनानुसार पाण्याचं सेवन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रथम वजन मोजणं आवश्यक आहे. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला 30 ने भागायचं. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं. समजा वजन 60 किलो असेल तर ते 30 ने भागाकार  केल्यास 2 ही संख्या मिळेल. म्हणजेच, 60 किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज 2 लिटर पाणी प्यावं. जर वजन 50 किलो असेल तर 1.6 लिटर (1 लिटर आणि 600 मिली) पाणी प्या. myupchar.com चे डॉ. आयुष पांडे म्हणतात की पुरेसं पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही. पाण्यात कर्बोदकांचं प्रमाण बिलकुल नसते. याचा अर्थ असा की आपण पुरेसे पाणी प्याल्यास आपण मोठ्या प्रमाणात कार्ब्स खाणं टाळता आणि याने वजन वाढण्याचा धोका देखील कमी होतो. दिवसभर वजनानुसार पुरेसे पाणी पिण्याची काळजी घ्या, जर तुम्ही व्यायाम करत असाल तर दर अर्ध्या तासाला किमान एक ग्लास पाणी प्या. याचे कारण असे आहे की व्यायामामुळे शरीरातील घाम निघून पाण्याची घट होते. त्याच वेळी, जेवण करण्यापूर्वी अर्धा लिटर पाणी प्या. त्याचा फायदा म्हणजे भूक कमी होईल.याची काळजी घ्या की तुम्ही तहान नसतानाही पाणी पीत रहाल. दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या. जर नुसते पाणी पिणे आपल्याला जमत नसेल तर नसल्यास चविसाठी पुदिना, लिंबू किंवा आंबट फळे घालू शकता. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published:

  Tags: Health, Water

  पुढील बातम्या