लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 ज्यूसेसचे सेवन करा

लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 ज्यूसेसचे सेवन करा

यकृत एक असे अंग आहे ज्याचा आकार फुटबॉल सारखा असतो, ते पोटाच्या उजवीकडे असते. अन्नाच्या पचनक्रियेसाठी तसेच विषारी पदार्थांपासून शरीराला मुक्त करण्यासाठी यकृत स्वस्थ राहणे आवश्यक आहे.

  • Last Updated: Dec 17, 2020 06:50 PM IST
  • Share this:

यकृत (Liver) कर्बोदकांना विरघळवण्याचे आणि ग्लुकोज निर्माण करण्यात तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करते. तसेच पोषक तत्वांना एकात्रित करून, पित्त बाहेर काढते. हे कार्य अन्नातील पोषण पोषक तत्वांचे पचन आणि शोषण करण्यासाठी आवश्यक आहे. myupchar.com च्या डॉ. विके राजलक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार, यकृत एक असे अंग आहे ज्याचा आकार फुटबॉल सारखा असतो, ते पोटाच्या उजवीकडे असते. अन्नाच्या पचनक्रियेसाठी तसेच विषारी पदार्थांपासून शरीराला मुक्त करण्यासाठी यकृत स्वस्थ राहणे आवश्यक आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी असे अनेक पेय आहेत ज्यांचे सेवन केले जाऊ शकते.

गाजराचा रस (Carrot Juice)

गाजराचा रस यकृताला चांगले आणि स्वच्छ ठेवतो. याच्या नियमित सेवनाने विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत होते. या व्यतिरीक्त गाजराचा रस यकृतामध्ये साठलेले पित्त आणि चरबी कमी करण्यात फायदेशीर आहे. यात विरघळणारे तंतुमय पदार्थ देखील चांगल्या प्रमाणात असतात जे यकृत आणि मलाशय स्वच्छ ठेवण्यात मदत करतात.

हिरव्या भाज्यांचा रस (Green Vegetables Juice)

जितक्या अधिक प्रमाणात हिरव्या भाज्यांचे सेवन कराल, तितक्या सहजतेने आपले शरीर विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यात सक्षम होईल. भाज्या कोशिंबीर म्हणून खायलाही चांगल्या असतात. परंतु रसाच्या रुपात घेतल्यास शरीरास त्यांचे पोषण द्रव्य मिळणे सुलभ होते.

बीटाचा रस (Beetroot Juice)

बीटाचा रस आरोग्यासाठी गुणकारी असतो. बीटामध्ये विविध पोषक घटक आणि अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की, बीटाचे सेवन यकृताला संरक्षण प्रदान करते. हे विषारी द्रव्ये काढून टाकण्याच्या प्रक्रियेस देखील मदत करते म्हणजेच मूत्रमार्गाच्या माध्यमातून शरीरातून विष बाहेर काढून शरीर शुद्ध करते.

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील मुक्त कण काढून टाकतात. ग्रीन टी शरिरातील चरबी विरघळवण्यास मदत करते. ज्याने यकृताचे कार्य सोपे होते. दिवसाला एक कप ग्रीन टी प्यायल्याने अतिरिक्त द्रव यकृताला देखील आधार देतो. आपण असा प्रयत्न करायला हवा की, त्यात कुठलाही गोड पदार्थ घालू नये जेणेकरून, यकृत विष द्रव्ये बाहेर टाकण्याचे अतिरिक्त काम करायला लागू नये.

हळदीचा चहा (Turmeric Tea)

हळदीचा चहा यकृताला निरोगी ठेवण्यास मदत करते. यकृत एंजाइम तयार करून रक्ताच्या शुद्धीचे कार्य करते आणि हळद या महत्त्वपूर्ण एंजाइमचे उत्पादन वाढवते. हे महत्त्वपूर्ण एंजाइम शरीरातील विषारी पदार्थांचे विभाजन करतात आणि त्यांचे प्रमाण कमी करतात. हे रक्ताभिसरण सुधारण्यात देखील मदत करते आणि हे सर्व घटक यकृताचे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. हळदीचा चहा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यात एक छोटा चमचा हळद घाला आणि 10 मिनिटे उकळी येऊ द्या. थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळीमिरी घाला.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - लिव्हर रोग: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 17, 2020, 6:50 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या