झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

सर्वांनाच लहानपणी झोपताना एक ग्लास गरम दूध आई द्यायची. तेव्हा ते न पिण्याचे अनेक बहाणे आपण करायचो.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 07:14 PM IST

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

सर्वांनाच लहानपणी झोपताना एक ग्लास गरम दूध आई द्यायची. तेव्हा ते न पिण्याचे अनेक बहाणे आपण करायचो. यावर उपाय म्हणून दूधात साखर, बॉर्नविटा, हॉर्लिक्स असे वेगवेगळे पदार्थ टाकून द्यायची. तर थंडीत दूधात हळद टाकून प्यायला दिलं जायचं. यामुळे सर्दीही बरी व्हायची. त्यामुळे हळद टाकून दिलेलं दूध म्हणजे औषधच आणि ते फक्त सर्दीतच प्यायलं जातं असा एक समज होऊन जातो. मात्र हळदीचं दूध पिण्याचे फार फायदे असून ते दररोज प्यायलं पाहिजे.

दूधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर हळदीत अँटीबायोटिकचे गूण असतात. त्यामुळे दूधात हळद मिसळून प्यायली तर त्याचा दुपट्टीने फायदा होतो. याशिवाय हळदीच्या दुधाचे आणखीन फायदे जाणून घेऊ...

- अंगदुखी कमी होते.

- संधिवाताच्या रुग्णांसाठी हळदीचं दूध पिणं फायदेशीर आहे.

- हाडांचं होणारं नुकसान आणि ऑस्टियोपोरेसिसच्या समस्या कमी होतात.

Loading...

- पचनसंबंधीत समस्याही कमी होतात.

- आतड्यांसंबंधीत आजार जसे अल्सर आणि कोलायटिस हे बरं होण्यास मदत मिळते.

- हाडं तर मजबूत होतातच शिवाय रोगप्रकारक शक्ती वाढते.

- श्वसनासंबंधी समस्यांसाठीही फायदेशीर आहे.

- शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू

मेंदूशी निगडीत या 10 खोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नसेल...

देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान

हा 'Jeasus Shoes' काही मिनिटांत विकले गेले, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...