झोपण्याआधी न विसरता प्या हळदीचं दूध, जाणून घ्या फायदे

झोपण्याआधी न विसरता प्या हळदीचं दूध, जाणून घ्या फायदे

हळदीचं दूध हे फक्त आजारी पडल्यानंतरच पितात असं वाटायचं. पण हळदीचं दूध शरीराला इतकं फायदेशीर आहे की, तुम्ही दररोज पिऊ शकता.

  • Share this:

आई आपल्या मुलांना लहानपणापासूनच दूध प्यायची सक्ती करते. अनेकदा मुलं दूध प्यायला नकार देतात तेव्हा ती त्यांच्या मागे धावतेही. मुलाने दूध प्यावं म्हणून बॉर्नविटा किंवा हॉर्लिक्ससारख्या गोष्टी घालून ती द्यायची. मुलांना बरं नसेल तेव्हा ती हळदीचं दूधही द्यायची. हळदीचं दूध प्यायल्याने सर्दी कुठच्या कुठे निघून जायची. पण त्यामुळेच हळदीचं दूध हे फक्त आजारी पडल्यानंतरच पितात असं वाटायचं. पण हळदीचं दूध शरीराला इतकं फायदेशीर आहे की, तुम्ही दररोज पिऊ शकता.

दूधात भरपूरप्रमाणात कॅल्शियम असतं तर हळदीत अँटीबायोटिक गुण असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र पोटात गेल्या तर त्याचा फायदा सर्वात जास्त होतो. आज आपण हळदीच्या दूधाचे फायदे जाणून घेणार आहोत.

- हळदीचं दूध प्यायल्याने अंगदुखी कमी होते.

- संधिवाताच्या रूग्णांसाठी फायदेशीर

- हाडाचं होणारं नुकसान आणि ऑस्टियोपोरेसिससारख्या आजारांसाठीही फायदेशीर आहे.

- आतड्या मजबूत करण्यासोबतच पोटाचा अल्सर आणि कोलायटिसच्या उपचारांसाठीही उपयुक्त आहे.

- हाडं मजबूत होतात आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

- श्वसानाच्या आजारांसाठीही उपयुक्त आहे.

- शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

KISS ने डिप्रेशन होतं दूर, जाणून घ्या याचे आणखीन फायदे!

या चार गोष्टी तुमचं लव्ह लाइफ उद्धस्त करतात!

ऑफिसमधला ताण कमी करायचाय तर हे उपाय कराच!

SPECIAL REPORT: पिंपरी चिंचवड पालिकेचा जक्कास उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

First published: August 18, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading