इंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन

मुलाखातीमध्ये तुमची निवड व्हायला हवी असं वाटत असेलं तर मात्र तुम्हाला तुमच्या नॉलेजसोबत या काही गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागेल.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 10:01 PM IST

इंटरव्ह्यूसाठी जाताना 'हा' ड्रेस कोड वापरावा, बॉसवर पडेल चांगलं इंप्रेशन

मुंबई, 13 जुलै : ‘फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ असं म्हटलं जातं.  जेव्हा तुम्ही मुलाखातीसाठी जाता तेव्हा तुमचं केवळ ज्ञानच नाही तर  तुमचा लुक, पर्सनॅलिटी आणि ड्रेसिंग स्टाईल यादेखील गोष्टी पाहिल्या जातात. अनेकदा चुकीच्या ड्रेसिंगमुळे सिलेक्शन बोर्ड तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतं. केवळ ड्रेसिंग स्टाईलमुळे आपल्याला एखाद्या कंपनीनं नाकारू नये, असं वाटत असेल तर हे नक्की वाचा. मुलाखतीला जाण्यापूर्वी आपण अनेकदा घाबरलेले असतो किंवा गोंधळाचा नादात आपण असे काहीतरी कपडे घालतो की जे आपल्याला शोभूनही दिसत नसतं. करिअरच्या दृष्टीकोनातून ही चूक करणं कटाक्षानं टाळा.

(वाचा : पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका सर्वाधिक, खा 'ही' फळं)

इंडस्ट्रीनुसार ड्रेसची निवड:

मुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे सर्वप्रथम लक्षात घ्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जाताना शक्यतो निळा, ग्रे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. तसेच फॉर्मल ड्रेसमुळे तुमची समोरच्यावर चांगली छाप पडते.

हेअर स्टाइल:

Loading...

मुलाखातीसाठी जाताना हेअर स्टाइलवर लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. तुमचे केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. मुलींनी शक्यतो केस मोकळे सोडावेत किंवा सिंपल पोनी टेल बांधावा. मुलांनी मुलाखातीसाठी जाताना क्लिन शेव्ह आणि हेअर स्टाइल सिंपल ठेवावी.

(तुमची उंची कमी आहे का? मग उंच दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स)

लाइट मेकअप:

मुलाखातीसाठी जाताना विशेषतः मुलींनी जास्त गडद मेकअप करू नये. यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होतं. त्यामुळे अत्यंत सिंपल आणि लाइट मेकअप करावा, तसेच हातात साधंसं घड्याळ घालावं. मुलाखातीसाठी जाताना बॅग जास्त मोठी तसंच फॅन्सी नसावी.

(वाचा : सतत स्ट्रेसमध्ये असता तर हा चहा प्या आणि आयुष्यातून ताण घालवा!)

शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...