Dr. Rx- PCOS महिल्यांच्या या आजाराकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Dr. Rx- PCOS महिल्यांच्या या आजाराकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

पीसीओएस हा एक स्त्रीवैद्यकीय हार्मोनल डिसऑर्डर आहे. त्यामुळे पीसीओएस संबंधीत प्रश्नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, ३० मार्च- जसलोक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचे गायनॅकवर्ल्डचे संचालक डॉ. दुरू शहा यांनी पीसीओएस या महिलांमधील आजाराबद्दल तपशीलात माहिती दिली आहे. पीसीओएस हा एक स्त्रीवैद्यकीय हार्मोनल डिसऑर्डर आहे. अमेरिकन बायोनेलॉजिस्ट इरविंग स्टेन आणि मायकेल लेव्हेन्थल यांनी १९३५ मध्ये पीसीओएसबद्दल पहिल्यांदा सांगितले. यामुळे त्यांच्या मूळ नावाने या आजाराला स्टेन-लेव्हेंथल सिंड्रोम असं संबोधलं गेलं आहे. भारतात, किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओएसचं प्रमाण ९.१३ टक्के आहे.

आजपर्यंत, पीसीओएस हा आजार नेमका कशामुळे होतो हे कळू शकलेलं नाही. परंतु यावर बरंच संशोधन सुरू आहेत. पीसीओएस संबंधीत प्रश्नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे. हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. जो अनुवांशिकतेने येतो तसंच बदलत्या जीवनशैलीमुळेही मुलींना पीसीओएससारख्या आजाराला सामोरं जावं लागतं. इंसुलिन प्रतिरोध(मधुमेहास कारणीभूत असणाऱ्या इंसुलिन हार्मोनचा अभाव) हे पीसीओए होण्याच्या मूळ कारणांपैकी एक आहे.  हे सामान्यपणे अनुवांशिकतेमुळे होतं.

पीसीओएसमध्ये तुम्हाला काय होते- अनियमित पाळी, वजन वाढणं, चेहऱ्यावरचे केस वाढणं, केस गळणं, मुरुमं येणं अशा अनेक समस्या सुरु होतात. तसेच, पीसीओएसमुळे दीर्घकाळ आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. पीसीओएसवर वेळीच उपचार घेतले नाहीत तर मधुमेह, हायपरटेन्शन, डिस्प्लिडेमिया यांसारखे आजार होऊ शकतात.

पीसीओएसचे निदान कसं करता यईल-  रॉटरडॅम मापदंडाचा वापर पीसीओएसचे निदान करण्यासाठी केला जातो. क्लिनिकल तपासणी, रक्त तपासणी आणि अल्ट्रासोनोग्राफी या निदानाबद्दल योग्य माहिती मिळते.

पीसीओएस आजार टाळण्यासाठी- जीवनशैलीत सुधारणा करणे हा पीसीओएसचा पहिला उपचार आहे. लठ्ठपणा पीसीओएस वाईट ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीजचा आहार घेणं, निरोगी राहणं, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. वजन कमी झालं की मासिक पाळी नियमित येते त्यामुळे शरीरातील इतर गोष्टीही सुरळीत होतात. आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे व्यायामांसह वजन नियंत्रीत ठेवण्याचा डाएट प्लॅन घ्या.

बर्थ कंट्रोल गोळ्या- या गोळ्यांमुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. तसेच केसांची वाढ होऊन मुरुमंही कमी होतात. गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यतादेखील कमी होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, याचा दीर्घकाळासाठी वापर केला जाऊ शकतो. या  गोळ्यांचा डोस सौम्य प्रमाणात असतो त्यामुळे दुष्परिणामांची शक्यता कमी असते.

मेटफॉर्फिनसारखी काही औषधं इंसुलिन प्रतिरोधक आणि कमी इंसुलिन पातळी वाढवतात. हे व्यायामासह वजन कमी करण्यास मदत करते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. गरोदर असणाऱ्या महिलांना हे औषध देता येते. मेटाफॉर्मिन गर्भधारणादरम्यान वापरल्यास गर्भधारणेत मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रतिबंधित करते. गर्भपातचं प्रमाणही कमी होतं.

ओव्हुलेशन-प्रेरक औषधे: ही औषधे बाळ न होणाऱ्या महिलांना ओव्हुलेट करण्यास मदत करतात. यात लेट्रोझोल आणि क्लॉमिफेनेसारख्या गोळ्या आणि एफएसएच आणि एलएचसारख्या हार्मोनल इंजेक्शन गोनाडोट्रोपिन यांचा समावेश आहे. ही औषधं मासिक पाळीच्या दुसऱ्या- तिसऱ्या दिवसापासून दिली जातात. ही औषधं दिल्यानंतर ओव्हुलेशन सामान्यतः अनुवांशिक वाढीचं आकलन करण्यासाठी असतात. तसेच या दरम्यान सिरीयल अल्ट्रासाऊंडद्वारे निरीक्षण केलं जातं, जेणेकरुन हायपरस्टिम्युलेशनसारख्या समस्या टाळतात. यातही आई न होणाऱ्या रुग्णांना आयव्हीएफ किंवा आयसीएसआय सारखे पर्यायही सांगितले जातात.

एण्टी- मेल हार्मोन्स ड्रग्स / अँन्ड्रॅन्डोजेन्स: अँन्ड्रोजनची पातळी जास्त असते तेव्हा हे घेतले जातात. त्यात एल्फोर्निथिन आणि स्पायरोनोलॅक्टोन आणि फ्लुटामाइड यासारखे क्रीम समाविष्ट असते. या ड्रग्जचा नर गर्भांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या औषधांचा वापर करताना गर्भधारणेस नकार दिला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 07:27 AM IST

ताज्या बातम्या