#Dr Rx- डायबेटिक आणि हायपरटेंशनच्या रुग्णांनी असा टाळावा हार्टअटॅक

#Dr Rx- डायबेटिक आणि हायपरटेंशनच्या रुग्णांनी असा टाळावा हार्टअटॅक

बदलत्या जीवनशैली आणि तणावामुळे तरुणाईमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढली आहे.

  • Share this:

जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. मयूर जैन यांनी हृदय रोग टाळण्याचे उपाय सांगितले आहेत. एकीकडे आपला देश विकसित होत आहे. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बदलत्या जीवनशैली आणि तणावामुळे तरुणाईमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढली आहे.

भारतातील मृत्युपैकी मुख्य कारण कार्डिओव्हस्कुलर हा आजार (सीव्हीडी) आहे. सीव्हीडीमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर एक चतुर्थांश आहे. जागतिक अभ्यासानुसार, जागतिक पातळीवरील अंदाजानुसार भारतातील मृत्यूचे दर १ लाख लोकसंख्येच्या २७२ इतके आहे. तर जागतिक सीव्हीडी मृत्युदर सरासरी १ लाख लोकसंख्येच्या २३५ इतका आहे. म्हणजे भारतातील सीव्हीडी मृत्यू दर सरासरीपेक्षा जास्त आहे. भारतातील सीव्हीडी मृत्यूंमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून, कमी वयामध्ये रोगाची लागण आणि अतिसंवेदनशील मृत्यू दर हे चिंतेचे कारण बनत चालले आहेत.

डाएट

शक्यतो तेल आणि चरबीयुक्त अन्न असलेले आहार घेऊ नका. किती प्रमाणात तेल सेवन करत आहोत त्यापेक्षा तेल कोणत्या प्रकारचे आहे हे अधिक महत्वाचे आहे.

पाम तेल, नारळ तेल आणि उच्च रबीयुक्त तेल असलेले इतर तेल वापरू नका.

तळलेले खाद्य पदार्थ टाळा. तसेच जंक फूड खाऊ नका आणि चीज, बर्गर, ब्रेडसारखे पदार्थ खाणं टाळा.

मोठ्या प्रमाणात लाल मांस खाऊ नका.

कोणता आहार घ्यावा

अन्नधान्य, हिरव्या पालेभाज्या, सलाड इत्यादी पदार्थासहित निरोगी आहाराचा वापर करा.

मासे अधिकप्रमाणात खा पण ते जास्त तळलेले असू नयेत.

भुईमूग तेल, ऑलिव ऑइल आणि तांदूळ ब्रेन ऑइल वापरा.

जर मधुमेह असेल तर शक्यतो मिठाई आणि साखर टाळा.

व्यायाम

हृदयरोग टाळण्यासाठी जलद चालण्याच्या स्वरूपात रोज व्यायाम करणं फार महत्वाचं आहे.

व्यायाम कोणत्याही स्वरुपात असू शकतो. तुम्ही चालणं, जॉगिंग करू शकता शिवाय स्विमिंग, बॅडमिंटनसारखे खेळ खेळू शकता. तसेच योगसाधनाही करू शकता.

लिफ्टच्या जागी जिन्याचा वापर करावा.

व्यायामाचे अनेक फायदे आहेत

तणाव कमी होतो.

मधुमेहावरील शुगरच्या प्रमाणावर नियंत्रण राहते.

रक्तदाबही नियंत्रीत राहतो.

चांगले रक्त परिसंचरण होते, यामुळे हृदयविकार कमी होतात.

चांगल्या कोलेस्टेरॉल एल.ए. एचडीएलमध्ये वाढ आणि खराब कोलेस्टेरॉल एलडीएलमध्ये घट होते.

आळशी जीवनशैलीमुळे लठ्ठपणा येतो ज्यामुळे हायपरटेन्शन मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका असतो.

ध्यान (मेडिटेशन)

ताण कमी करण्यासाठी, दररोज रक्तदाब आणि मधुमेहावरील चांगल्या नियंत्रणासाठी १० -१५ मिनिटांचे ध्यान करावं.

हृदयविकाच्या रूग्णांसाठीदेखील हे खूप महत्वाचे आहे.

बीएमआय चांगले ठेवा

चांगले बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असणं अत्यंत महत्वाचे आहे. पुरेसा व्यायाम आणि निरोगी आहार यांचा समतोल राखावा ज्यामुळे वजन वाढणं आणि लठ्ठपणा टाळण्यास मदत होईल.

कॅलरीची मात्रा मर्यादित ठेवावी.

सूचना

तंबाखूचे सेवन हे हार्ट अटॅकचे प्रमुख कारण आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयरोग आणि हायपरटेन्शन होण्याची शक्यता २-३ पट अधिक असते.

दारूचे नियंत्रण अगदी महत्वाचे आहे.

मद्यपान आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणं आरोग्यास हानिकारक आहे. अरिहर्टिमिया आणि हृदयविकाराच्या कार्डियॅकची जोखीम अधिक वाढवते.

तणाव टाळा

आपल्या आयुष्यात जास्त ताण कमी कसा करावा हे शिकले पाहिजे. ध्यान, योग, नृत्य संगीत हे वेगवेगळ्या प्रकारचे विश्रांती पद्धती आहेत, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाच्या घटना कमी होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 08:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading