Dr. Rx- अर्धर्शिशीच्या त्रासाने तुम्हीही त्रासला आहात का? मग हे एकदा वाचा

अर्धर्शिशीची लक्षणं काय असतात आणि सामान्य डोकं दुखण्यापेक्षा हे वेगळं कसं असाही प्रश्न अनेकांना पडतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 07:14 AM IST

Dr. Rx- अर्धर्शिशीच्या त्रासाने तुम्हीही त्रासला आहात का? मग हे एकदा वाचा

मुंबई, १ एप्रिल- जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. पृथ्वीराज दाबरसे यांनी अर्धर्शिशीचा (मायग्रेन) त्रास का होतो आणि त्यावर कोणते उपाय करावेत याची संक्षिप्त माहिती दिली आहे. मायग्रेनचा त्रास मुळात का होतो हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. डोकेदुखीचाच एक भाग म्हणजे अर्शर्शिशी अर्थात मायग्रेन. साधारणपणे १५ ते २० टक्के लोकांना हा त्रास होतो. यात डोकं नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात दुखतं.

अनेकांना मायग्रेनबद्दल फारसं माहीत नसल्यामुळे याला सर्वसामान्य डोकं दुखणं असंच मानलं जातं. हा आजार अनुवंशीकही असू शकतो. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. यात अनेकदा डोक्याचा एकच भाग सहन होऊ शकत नाही एवढ्या प्रमाणात दुखतो.

अर्धर्शिशीची लक्षणं काय असतात आणि सामान्य डोकं दुखण्यापेक्षा हे वेगळं कसं असाही प्रश्न अनेकांना पडतो. अर्धर्शिशीच्या सामान्य लक्षणांमध्ये प्रखर प्रकाश, कर्कश आवाज, दुर्गंध यांमुळे डोकं दुखायला सुरुवात होऊ शकते. काही वेळानंतर अर्धर्शिशीचा त्रास सुरू होतो. तसंच उलट्या आणि मळमळणामुळेही हा त्रास होऊ शकतो. दे दुखणं हळू हळू वाढतं आणि काही तास टिकून राहतं. अशावेळी थोडावेळ आराम करणं उत्तम. पण अनेकदा झोपूनही मायग्रेनचा त्रास कमी होत नाही. म्हणून अनेकदा पेनकिलर घ्यावी लागतात. तसेच असिडीटीमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचा त्रास कमी कसा करावा-

शक्यतो प्रिझरव्हेटीव्ह पदार्थ खाणं टाळा तसेच रेडीमेड आणि माययक्रोव्हेवमध्ये तयार केलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो आणि बळाऊही शकतो. तसेच

Loading...

चायनीज पदार्थ, अजिनोमोटो, मोनोसोडियम ग्लूटामेट, चीज, डार्क चॉकलेट खाणं टाळा.

सतत डोक्यावरून आंघोळ करणं, तासन् तास एअरकंडिशनमध्ये बसणं यामुळे मायग्रेनचा त्रास बळावतो. नियमित मासिक पाळी येत नसेल तरीही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खाणं फार आवश्यक आहे.

शक्यतो घरचं ताजं जेवण जेवायला प्राधान्य द्या. तसेच मुबलक प्रमाणात पाणी प्या. जेवणाच्या वेळा चुकवू नका.

व्यायामामुळेही मायग्रेनच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. खास माइग्रेनसाठी विशिष्ट असे व्यायाम नाहीत. पण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं फार महत्वाचं आहे. दररोज ३५ ते ४५ मिनिटं किंवा आठवड्यातून पाच ते सहा वेळ व्यायाम करा. लठ्ठ व्यक्तींनी पोहण्याचा व्यायाम केला तर मायग्रेन कमी होण्यास मदत होईल.

योग आणि प्राणायाममुळेही मायग्रेनवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पण योग करताना डोक्यावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

मायग्रेन वाढण्याची सामान्य कारणं- अपुरी झोप, जेवणाची टाळाटाळ, उन्हामध्ये काम करणं, शारीरिक, मानसिक तणाव तसेच सततचा प्रवास यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो आणि तो उत्तरोत्तर वाढतही जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...