News18 Lokmat

#DrRx- ही लक्षणं तुमच्यात आहेत तर तुम्ही नक्कीच तणावात आहात

अनेकदा आपल्यावर खूप तणाव आहे किंवा आपण नैराश्यग्रस्त आहोत हेच माहीत नसते. त्यावर आपण कधीही विचार करत नाही. पण हे फार धोकादायक आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 06:43 AM IST

#DrRx- ही लक्षणं तुमच्यात आहेत तर तुम्ही नक्कीच तणावात आहात

मुंबई, १० फेब्रुवारी २०१९- जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ. रितिका अगरवाल यांनी तणावाची लक्षण आणि त्याच्यावर करायच्या उपायांबद्दल काही टीप्स दिल्या आहेत. वाढती स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक माणूस हा तणावातच असतो. स्वतःसाठी आता त्याला वेगळा वेळ काढावा लागत आहे. स्वतःसाठीचा वेळ घरच्यांसाठीचा वेळ, कामासाठीचा वेळ अशा सर्व पातळीवर तारेवरची कसरत करून प्रत्येकजण थकला आहे. पण तरीही थांबून चालणार नाही हे माहीत असल्यामुळे स्वतःला पुढे ढकलत नेत आहे.

मानसिक स्वास्थ्य टिकून राहणं फार आवश्यक आहे. जर मानसिक स्वास्थ्य असेल तर माणूस कोणत्याही प्रसंगाला धीराने सामोरे जाऊ शकतो. अनेकदा आपल्यावर खूप तणाव आहे किंवा आपण नैराश्यग्रस्त आहोत हेच माहीत नसते. त्यावर आपण कधीही विचार करत नाही. पण हे फार धोकादायक आहे. सवयींवरून तुम्ही तणावग्रस्त आहात की नाही हे कळतं. यासाठी तुम्ही मानसशास्त्राची मदतही घेऊ शकता. खाली सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी सारख्याच असतील असे नाही.

शारीरिक लक्षणं-

कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती.

डोकेदुखी, मायग्रेन, सामान्य वेदना आणि स्नायूंचा ताण

Loading...

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणं जसे की 'पोटात दुखणे', अम्लता, मळमळ, अस्वस्थ पोट, कब्ज किंवा अल्सर

श्वसन विषयक लक्षणं जसे श्वास घेण्यात अडचण येणे, हायपरवेन्टिलेशन किंवा छातीच्या भागात दबाव जाणवणे.

कार्डिओव्हास्कुलर लक्षणं रक्तदाब आणि हृदयविकाराची वाढ

सतत थकल्यासारखे वाटणे

तणावाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देण्यासाठी रक्तातील साखर वाढते तसेच कोरडे तोंड, अति घाम

महिलांमध्ये, मासिक पाळी अनियमित येणे किंवा वेदनादायक मासिक पाळी येणे, तर पुरुषांना त्यांच्या प्रजनन प्रणालीच्या सामान्य कार्यामध्ये अडथळे येतात.

भावनिक लक्षणे

चिडचिड, निराशा, किंवा रडावेसे वाटणे

राग येणे स्वाभाविक आहे, परंतु मानसिक ताण असताना नेहमीपेक्षा जास्त कठोरपणे तुम्ही वागता.

आत्मविश्वास गमावणे किंवा प्रत्येक बाबतीत माघार घेणे

तणावात असल्यामुळे भावनांवरून नियंत्रण सुटणे.

स्वतः बद्दल कमीपणा वाटणे

आकलनात्मक लक्षणे

लक्ष केंद्रित करण्यास कठीण जाते.

गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येते.

सतत चिंता करणे किंवा सर्वकाही विश्लेषित करणे

फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ; आपण ज्या यशस्वीरित्या ज्या गोष्टी पूर्ण केल्या त्या ५ पैकी एक कार्य पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यास त्यावरच नकारात्मक लक्ष केंद्रित करणे.

त्वरित निर्णय घेण्यात अडचण

वर्तनाची लक्षणे:

लवकर झोप न लागणे किंवा खूप झोप येणे

भूक कमी किंवा वाढणे

स्वतःला इतरांपासून वेगळं करणे

पाय जमिनीवर घासत चालणे तसेच नखं खाणं

एक काम पूर्ण करण्याच्याआधीच दुसऱ्या कामाचा विचार करणं आणि ते काम कसं पूर्ण करायचं या चिंतेत आधीचं काम अपूर्ण सोडणं.

मद्य आणि सिगरेटचं व्यसन लागणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 06:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...