#drambedkar- असे होते बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे 6 दिवस

पुस्तक वाचून झाल्यावर उठताना ते जोरात ‘चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा!’ हा दोहा मोठ्याने बोलू लागले.

  • Share this:

समता आणि बंधुतेची शिकवण देणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गुरुवारी 62 वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी देशातल्या कोट्यवधी लोकांना आत्मभान दिलं. जगण्याची प्रेरणा दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. खडतर वाटेवरूनही स्वाभिमानाने चालायला शिकवलं. बाबासाहेब फक्त उपदेशच करत नव्हते तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तेही तसच जगले. बाबासाहेबांच्या शेवटच्या सहा दिवसांमधल्या प्रवासाची ही प्रेरक कहाणी...

1 डिसेंबर 1956- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री यांच्यासोबत भेट दिली. यानंतर धर्मगुरु दलाई रामा यांच्या सत्कार सोहळ्यालाही ते उपस्थित होते.

2 डिसेंबर- ‘हे ग्रंथ मी जिवंत असतानाच प्रकाशित होतील ना?’ असा प्रश्न बाबासाहेबांनी त्यांचे सहाय्यक रत्तू यांना ते लिहित असलेल्या ग्रंथाबद्दल विचारलं. कदाचित पुढे येणाऱ्या निर्वाणाची त्यांना पुसटशी कल्पना आली असावी.

3 डिसेंबर- आंबेडकरांनी जे- जे लिहिलं होतं त्यांनी ते सर्व टाईप केलं. त्या दिवशी ते त्यांच्या आजारी माळ्याला पाहायला गेले. आंबेडकरांना आपल्या घरी पाहून तो माळी ढसाढसा रडू लागला. त्याचे सांत्वन करताना आंबेडकर म्हणाले की, ‘रडू नकोस, आज ना उद्या आपल्याला जावंच लागणार आहे. मरण कोणालाही चुकलं नाही.’ आंबेडकरांनी त्यापूर्वी कधीही निर्वाणीची भाषा केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या तोंडून अशी वाक्य ऐकल्यानं साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं.

4 डिसेंबर- बाबासाहेबांनी त्यांनी लिहिलेल्या अनेक मजकूर आणि लेखांवर स्वाक्षरी केली. तसंच त्यांनी आचार्य अत्रे आणि एस.एम. जोशी यांना पत्र लिहीली. या दिवशी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं ध्येय हा 15 पानांचा लेखही लिहिला.

5 डिसेंबर- प्रकृती अत्यंत खालवलेली असूनही बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि मार्क्स’ या ग्रंथाचा काही भाग लिहिला. दिवसभर बाबासाहेब झोपूनच होते. शेवटी संध्याकाळी रत्तू यांनी बाबासाहेबांना जेवणाचा आग्रह केला. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र रत्तू यांनी आग्रह केल्यामुळे ते जेवणासाठी ड्रॉईंग रूममध्ये जेवणाच्या खोलीत जायला निघाले.

ड्रॉईंग रुममध्ये बाबासाहेबांनी जमवलेली ग्रंथ संपदा होती. बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने त्या सर्व पुस्तकांकडे पाहीलं. त्यातली काही पुस्तकं त्यांनी रत्तू यांच्या हातात दिली. रत्तू यांच्या आग्रहामुळे त्यांनी दोन घास खाल्ले. त्यानंतर ते परत ड्रॉईंग रुममध्ये पुस्तकांजवळ बसले. तिथून उठताना ते जोरात ‘चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा!’ हा दोहा मोठ्याने बोलू लागले. यानंतर बिछान्यावर झोपताना त्यांनी टेबलाजवळ असलेली पुस्तकं चाळली आणि अत्रे आणि जोशी यांना लिहिलेली पत्र पुन्हा वाचली. त्यानंतर ते झोपी गेले.

6 डिसेंबर- अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात 5 डिसेंबरला शेवटचा सूर्य उगवला. 6 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत वाचन केल्यानंतर ते झोपले. ६ तारखेला झोपेतच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 06:25 AM IST

ताज्या बातम्या