जेवण बनवा आणि मिळवा विविध बक्षिसं, वाचा कशी जिंकाल JIO ची ही भन्नाट स्पर्धा

जेवण बनवा आणि मिळवा विविध बक्षिसं, वाचा कशी जिंकाल JIO ची ही भन्नाट स्पर्धा

तुम्हाला स्वयंपाक करणं आवडतं का? तुम्ही देखील व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या पाककृती शिकता? तर स्वयंपाक शिकण्याची तसंच उत्तम बक्षिसं मिळण्याची सुवर्णसंधी जिओकडून (JIO) मिळते आहे

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर: या फेस्टीव्ह सीझनमध्ये, JioNews आणि JioTv app  कुकिंग फेस्टिव्हिटीज विथ रणवीर ब्रार (Cooking Festivities with Ranveer Brar) नावाची एक पाककला स्पर्धा घेऊन येत आहे. ज्यामध्ये तुम्ही Phillips कंपनीकडून दररोज खूप छान किचन अप्लाएंसेस जिंकू शकता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये JioNews आणि JioTv चे apps इंस्टॉल करावे लागतील. शिवाय शेफ रणवीर ब्रारचा व्हिडीओ पाहावा लागेल.

यानंतर तुम्हाला सोशल मीडियावरील व्हिडीओशी संबंधित प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. लक्षात घ्या, ही स्पर्धा दोन आठवड्यांसाठी असणार आहे, जी 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे. चला तर मग वाट कसली पाहताय? संधी न गमावता या स्पर्धेत भाग घ्या आणि बरीच आश्चर्यकारक बक्षिसं जिंका.

(हे वाचा-Gold Price: 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं पुन्हा महागलं,1102 रुपयांनी वधारली चांदी)

रणवीर ब्रार हे एक प्रसिद्ध शेफ आहेत जे मास्टर शेफ सीझन 6 मध्ये परिक्षक देखील राहिले आहेत. याखेरीज त्यांचे बरेच टीव्ही कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 'द ग्रेट इंडियन रसोई, 'हेल्थ भी टेस्ट भी', 'थँक गॉड इट्स फ्रायडे” असे शो विशेष लोकप्रिय आहेत. एवढेच नाही तर रणवीर यांना आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्याबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 24, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या