• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Voter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड

Voter ID हरवलं तर चिंता नको, अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड

मतदान कार्ड हरवल्यानंतर (Voter ID lost) घाबरुन जायची गरज नाही. तुमचं मतदान ओळखपत्र तुम्हाला पुन्हा डाउनलोड करता येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 जुलै : आपले व्होटर आयडी, म्हणजेच मतदान ओळखपत्र (Voter ID) हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केवळ मतदान करण्यासाठीच नाही, तर आपली ओळख सिद्ध करण्यासाठीही हे कार्ड उपयोगी आहे. तसंच, कित्येक सरकारी कामांमध्ये व्होटर आयडी दाखवणे आवश्यक असते. मग एवढं महत्त्वाचं असे हे मतदान कार्ड जर हरवलं, तर काय कराल? मतदान कार्ड हरवल्यानंतर (Voter ID lost) घाबरुन जायची गरज नाही. तुमचं मतदान ओळखपत्र तुम्हाला पुन्हा डाउनलोड करता येणार आहे. चला पाहूया, की घरबसल्या तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र कसं डाउनलोड (How to download voter ID) करू शकाल. डिजिटल व्होटर आयडी (Digital Voter ID) डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्होटर पोर्टल (voterportal.eci.gov.in) या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अशा प्रकारे डाउनलोड करा तुमचं मतदान ओळखपत्र हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर (https://www.nvsp.in/account/login) लॉगईन करावे लागेल. यानंतरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आपला ईपीआयसी नंबर (EPIC number) किंवा फॉर्म रेफरन्स नंबर (Form Reference number) एंटर करावा लागेल.

  रिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण

  यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी तुम्हाला वेब पोर्टलवर एंटर करावा लागेल. यानंतर वेबसाईटवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी डाउनलोड ई-एपिक (Download e-EPIC) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमचे डिजिटल व्होटर आयडी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल. रंगीत मतदान ओळखपत्रही करू शकाल तयार साधारणपणे आपले मतदान ओळखपत्र कृष्णधवल, म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट असते. मात्र, आता तुम्ही रंगीत (Colour voter ID) किंवा प्लास्टिक व्होटर आयडीही (Plastic Voter ID) तयार करू शकणार आहात. घरबसल्या तुम्ही हे कार्ड मागवू शकणार आहात. हे कार्ड आकारने छोटे असते, तसेच याची प्रिंटिंग क्वालिटीही तुलनेने अधिक चांगली असते. विशेष म्हणजे हे कार्ड तयार करण्यासाठी केवळ तीस रुपये खर्च (Digital voter ID Cost) येतो. नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य केवळ मतदान ओळखपत्र हरवल्यावरच नाही, तर इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी वेबसाईटवर जाण्याचा पर्याय उपलब्ध आहेत.हा खूपच सोपा पर्याय आता सरकारने उपलब्ध करून दिल आहे. यासोबतच, 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुनही मतदान ओळखपत्रासंबंधी अडचणी (Issues about voter ID) सोडवता येतील.
  First published: