Home /News /lifestyle /

Ear Pain in Winters: हिवाळ्यातील कान दुखीकडं दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं

Ear Pain in Winters: हिवाळ्यातील कान दुखीकडं दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

सर्दीमुळे, नाकापासून कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवतात. त्यामुळे संसर्ग वाढतो आणि जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. कफ अडकल्यामुळे तीव्र वेदनांचा त्रास होतो.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : तुम्हाला हिवाळ्यात कान दुखण्याची (ear pain) समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी कान दुखण्याचे कारण सामान्य असू शकते आणि कदाचित ते थंडीमुळे देखील असू शकते. तर काही प्रकरणांमध्ये, हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू (ear pain in winter) शकतं. या कारणांमुळे कानात वेदना होतात 'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, कानदुखी जिवाणू किंवा विषाणू संसर्गामुळे होऊ शकते. यामुळे, तुम्हाला ताप, उलट्या आणि चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते. थंडीमुळे कानात तीव्र वेदनाही (ear pain) होऊ शकतात. तुम्हाला हिवाळ्यात सर्दीचा (Winter Cold) त्रास होत असेल आणि हा त्रास दीर्घकाळ राहत असेल तर त्यामुळे कान दुखी देखील होऊ शकते. सर्दीमुळे, नाकापासून कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवतात. त्यामुळे संसर्ग वाढतो आणि जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. कफ अडकल्यामुळे तीव्र वेदनांचा त्रास होतो. हिवाळ्यात असा त्रास होत असेल तर त्यावर ताबडतोब उपचार करा, अन्यथा हा संसर्ग गंभीर रूप घेऊ शकतो. दातांच्या दुखण्यामुळे कानात दुखण्याची समस्या देखील होऊ शकते. दातांसंबंधी काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपाय - सर्दीमुळे किंवा सामान्य कारणांमुळे कानात दुखत असेल तर हे उपाय करता येतील. कांद्याचा रस कांद्याच्या रसाने कानदुखीच्या समस्येवर आराम मिळतो. अचानक कानात दुखत असल्यास कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब कानात टाकावेत. यामुळे दिलासा मिळेल. हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका मोहरीचे तेल कानात दुखत असेल तर मोहरीच्या तेलानेही या समस्येत आराम मिळेल. यासाठी तेल हलके गरम करून दोन ते तीन थेंब कानात टाकावेत. हे वाचा - Eyes Health Care Tips: डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; दिसतील आश्चर्यकारक परिणाम लसूण तेल मोहरीच्या तेलात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या गरम करून हे तेल कानात घालावे. तेल कानात घालताना ते जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यावी. जर वेदना सौम्य असतील तर हा उपाय तुमच्या कामी येईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Winter, Winter session

    पुढील बातम्या