Home /News /lifestyle /

Fruit Tips: दुपारी 2 नंतर फळे खाऊ नयेत? कोणती वेळ आहे सर्वात हेल्दी आणि सुरक्षित

Fruit Tips: दुपारी 2 नंतर फळे खाऊ नयेत? कोणती वेळ आहे सर्वात हेल्दी आणि सुरक्षित

काही लोक म्हणतात की दुपारी दोन नंतर फळे खाऊ नका, तर काही म्हणतात की 4 वाजल्यानंतर खाऊ नये. प्रत्येकाचा वेगवेगळा सिद्धांत आहे. काही लोक म्हणतात की दुपारी फळे खाल्ल्याने वजन वाढते. याबाबत नेमकं काय ते जाणून घेऊया.

    मुंबई, 27 जून : दररोज फळे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फळे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि शरीराला गंभीर आजारांपासून वाचवतात, म्हणून फळांना पोषक तत्वांचे पॉवरहाऊस म्हटले जाते. आहारतज्ज्ञ प्रत्येक व्यक्तीला दररोज फळे खाण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक सकाळी नाश्त्यात फळे खातात तर काही लोक सकाळी स्नॅक्समध्ये. दुपारी किंवा संध्याकाळी फळे खाणारेही बरेच लोक आहेत. फळे खाण्याच्या वेळेबद्दल अनेक समज-गैरसमज (Best time to eat fruit) आहेत. आज तकने दिलेल्या बातमीनुसार, फळे खाण्याच्याबाबतीत असं म्हटलं जातं की, दुपारी 2 नंतर फळे खाऊ नयेत. तर काही लोक रात्रीच्या वेळी देखील फळे वर्ज्य करण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया दुपारनंतर फळे खावीत की नाही. तज्ज्ञ काय म्हणतात - काही लोक म्हणतात की दुपारी दोन नंतर फळे खाऊ नका, तर काही म्हणतात की 4 वाजल्यानंतर खाऊ नये. प्रत्येकाचा वेगवेगळा सिद्धांत आहे. काही लोक म्हणतात की दुपारी फळे खाल्ल्याने वजन वाढते, तर काही लोक म्हणतात की पचन बिघडते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो, असेही काहींचे म्हणणे आहे. पण यापैकी एकही दावा खरा नाही. फायबरचा उत्तम स्रोत असण्याव्यतिरिक्त, फळांमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात. फळ खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंबा आणि इतर फळे खाण्याची योग्य वेळ याविषयीही अनेक समज पसरवले जातात, परंतु त्या मिथकांना बरोबर सिद्ध करण्यासाठी फार कमी वैज्ञानिक पुरावे आहेत. फळांमध्ये कॅलरी जास्त नसतात आणि रात्रीच्या वेळी ते इतके धोकादायक नसतात, म्हणून याबाबत घाबरणे थांबवा. फळे शरीराला अनेक फायदेशीर पोषक आणि फायबर देतात. ते निरोगी आहाराचा भाग आहेत. दिवसाच्या कोणत्याही वेळी फळे खाणे चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, झोपेच्या आधी 3 तास फळे किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ नये असे म्हणतात. असे केल्याने झोप चांगली लागते आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. निरोगी राहण्यासाठी ही फळे खा - अननस - अननसला पोषणाचा सुपरस्टार म्हणतात. एक कप अननस रोजच्या सेवनात 131 टक्के व्हिटॅमिन सी आणि 76 टक्के मँगनीज पुरवतो. ब्रोमेलेन अननसमध्ये आढळते जे दाहक-विरोधी एन्झाईम्सचे मिश्रण आहे आणि प्रथिने पचवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. टेस्ट-ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की अननसमध्ये आढळणारे ब्रोमेलेन कर्करोग आणि ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करते. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा पपई - पपई हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि फोलेटने समृद्ध असलेले अतिशय आरोग्यदायी फळ आहे. त्यात लाइकोपीन सारखे कर्करोग विरोधी अँटीऑक्सिडंट देखील असतात. शरीराला इतर फळे आणि भाज्यांपेक्षा पपईमधून जास्त प्रमाणात लाइकोपीन मिळते. पपईमुळे पचनक्रियाही सुधारते. याशिवाय वजन कमी करण्यातही हे गुणकारी आहे. सफरचंद- सफरचंद हे सर्वात लोकप्रिय आणि पौष्टिकतेने समृद्ध फळांपैकी एक आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असते. सफरचंदात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स हृदयाला निरोगी ठेवतात आणि टाइप 2 मधुमेह, कर्करोग आणि अल्झायमरचा धोका कमी करतात. याशिवाय सफरचंदामुळे हाडांची घनताही वाढते. सफरचंदात आढळणारे पेक्टिन आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवते आणि पचन आणि चयापचय सुधारते. डाळिंब- डाळिंब हे आरोग्यदायी फळांपैकी एक मानले जाते. डाळिंबात ग्रीन टी आणि रेड वाईनपेक्षा तिप्पट अँटीऑक्सिडंट असतात. डाळिंबात आढळणारे दाहक-विरोधी घटक कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या टरबूज- टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये लाइकोपीन, कॅरोटीनॉइड्स आणि क्युकरबिटासिन ई सारखे अँटीऑक्सिडंट आढळतात, जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात. लाइकोपीन हृदय निरोगी ठेवते आणि उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. टरबूज खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या