Home /News /lifestyle /

कलरफूल आयलायनर लावताना ‘या’ चुका टाळा; मेकअप होईल खराब

कलरफूल आयलायनर लावताना ‘या’ चुका टाळा; मेकअप होईल खराब

आयलायनरची निवड आपल्या ड्रेसच्या रंगानुसार करावी. म

आयलायनरची निवड आपल्या ड्रेसच्या रंगानुसार करावी. म

मुलींना ट्रेन्डी लूक (Trendy Look) आवडतो आणि सध्या कलरफूल लायनर ट्रेन्डमध्ये आहे. काही वेळा लायनर लावताना झालेल्या चूका सगळा मेकअप बिघडवतात.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : आता सणांचे दिवस सुरू आहेत. म्हणजेच मुली आणि महिलांचे नटण्या-थटण्याचे दिवस आहेत असंही म्हणता येऊ शकतं. लिप्स्टीक, मस्करा, आयलायनर लावल्यानंतर चेहरा खुलून दिसतो. पण, मेकअपचा ट्रेन्ड (Makeup Trend) सतत बदलत असतो. हल्ली अनेक कंपन्यांचे कॉस्मेटिक्स (Cosmetics) उपलब्ध आहेत. आतातर, लायनरचे (Liner) इतके कलर आले आहेत की, मुली ड्रेसवर मॅचिंग लायनरही लावतात. पूर्वी मुली, महिला काळं किंवा ब्राऊन आयलाइनर लावायच्या. तशा ब्रॉड लायनरने डोळे टपोरे दिसातात. त्यासोबत काजळ लावलं तर, सौंदर्य आणखीन खुलतं. आता रंगीत लायनरची फॅशन (Fashion) आहे. अशा प्रकारचे लायनर डोळ्यांना आकर्षक लूक देतात. पण, फॅशनच्या नादात हे लायनर लावताना काही चुका (Mystique) झाल्या तर, सगळ्या तयारीवर पाणी पडू शकतं. त्यामुळे अशा लायनरची निवड कशी करायची? ते कसे लावायचे? काय काळजी घ्यायची ? याचीही माहिती असायला हवी. लायनर लावताना या चुका टाळा 1 बऱ्याच मुली हेवी मेकअप करून त्यावर आयलायनर लावतात. पण, हेवी मेकअपवर लावलेलं लायनर मेसी लूक देतं. त्यामुळे डोळ्यांना काळ्या लायनरऐवजी निळ्या, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं आयलायनर लावताना कधीही मेकअप हलका करावा. म्हणजेच अशा वेळेस चेहऱ्यावर बीबी क्रिम किंवा लाईट कलरची लिपस्टिक लावावी. (औषधी गुळाचे आहेत बरेच फायदे; आरोग्याबरोबर त्वचेसाठीही उपयोगी) 2 आयलायनरची निवड आपल्या ड्रेसच्या रंगानुसार करावी. म्हणजे ज्या रंगाचा ड्रेस घालणार असाल त्याला शोभणारा कलर वापरावा. गडद लाल रंगाच्या ड्रेसबरोबर गुलाबी रंगाचं लायनर वापरू नये. 3 काही मुलींना आयलायनर लावताना डोळ्या जवळची त्वचा खेचायची सवय असते. त्यामुळे पूर्ण लूक खराब होऊ शकतो. कदाचीत लायनर पसरूही शकतं. त्यामुळे लायनर लावताना डोळ्या भोवतालची त्वचा ओढू नका. (जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण) 4 रंगीत लायनर लावताना काळ्या रंगाचा मस्कराच वापरावा. उगीचच कोणत्याही रंगाच्या प्रेमात पडून डोळ्यांवर भडक रंगाचा मस्करा लावू नयेत किंवा आवडत असेल तर, ट्रान्फरन्ट मस्करा लावला तरी चालू शकतो. (Anti dandrafuff शाम्पूनेही केसातील कोंडा जाईना; अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरून पाहा) लायनर कसं काढावं ? याशिवाय लायनर लावताना ज्या प्रकारे काळजी घेतो त्याच प्रकारे ते काढतानाही काळजी घ्यायला हवी. डोळे हा अतिशय नाजूक अवयव आहेत. त्यामुळे डोळे सुंदर दिसावेत यासाठी मेकअप करताना आपण आपल्या सौंदर्याची जशी काळजी घेतो. तशीच तो काढतानाही घ्यायला हवी. डोळ्यांचा मेकअप कधीही घासून काढू नये. (ग्लासभर लिंबूपाण्याचे बरेच फायदे; पण पिताना एक काळजी मात्र जरूर घ्या) त्यासाठी चांगल्या प्रतीचं मेकअप रिम्हूवर, क्लिंजिंग मिल्क वापरावं किंवा तेलानेही डोळ्यांचा मेकअप काढता येतो. याकरता चांगल्या प्रतिच्या नारळ तेलाचा वापर करता येऊ शकतो. नारळ तेलामध्ये कॉटन पॅड बुडवून काही सेकंदासाठी आपल्या पापण्यांवरती ठेवा आणि सावकाश लायनर पुसा. यानंतर फेसवॉशने आपला चेहरा स्वच्छ धुवा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या