Home /News /lifestyle /

कोरोना योद्धांसाठी गाढव झालं डॉक्टर; Donkey therapy ने राखलं जातंय मानसिक आरोग्य

कोरोना योद्धांसाठी गाढव झालं डॉक्टर; Donkey therapy ने राखलं जातंय मानसिक आरोग्य

कोरोनाशी दोनहात करणारे कोरोना योद्धा (corona warriors) डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला शारीरिक आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी असा मार्ग निवडला आहे.

    माद्रिद, 21 ऑक्टोबर : कोरोना रुग्णांची सेवा करता करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचं आरोग्यही धोक्यात येत आहे. या कोरोना योद्धांना (corona warriors) दिवसरात्र काम करावं लागतं आहे, कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. अशाच कोरोना योद्धांसाठी गाढव आता डॉक्टर झालं आहे. डाँकी थेरेपी (Donkey therapy) घेण्यासाठी हे कोरोना वॉरिअर्स डॉक्टर डाँकीकडे (Doctor Donkey) जाऊ लागले आहेत. स्पेनमध्ये (spain) असा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दक्षिण स्पेनमधील The Happy Little Donkey या संस्थेने अल्झायमर रुग्ण आणि इतर मानसिक समस्या असलेल्या मुलांवर उपचारांसाठी डाँकी थेरेपीचा उपयोग केला आहे आणि जून 2020 पासून कोरोनाव्हायरशी लढणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्ससाठी  डॉक्टर डॉंकी उपक्रम सुरू केला. अॅनिमल थेरेपी जी तणाव, नैराश्य आणि चिंता यासह अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांवर मात करण्यास मदत करते. बहुधा घोड्यांचा यासाठी वापर केला जातो, मात्र तज्ज्ञांच्या मते, सौम्य स्वभावामुळे गाढवं मानसिक किंवा भावनिक विकारांमध्ये माणसाला साथ देण्यात उत्तम आहे. या प्रकल्पाच्या सल्लागार मानसशास्त्रज्ञ मारिया जीसस आर्क यांनी सांगितलं, अॅनिमल थेरेपी शारीरिक पातळीवर बदल घडवून आणते. प्राण्यांसोबत राहिल्याने माणसाच्या शरीरातील ऑक्सिटोसिन वाढतं. तर तणावास कारणीभूत ठरणारं कोर्टिसोल कमी होतं आणि एंडोफिन वाढतं, ज्यामुळे बरं वाटतं. हे वाचा - कोरोनाचा फटका! मध्यमवयीन नोकरदारांपेक्षा ज्येष्ठांनी गमावल्या सर्वाधिक नोकऱ्या डाँकी थेरेपीत एखाद्या गाढवाशी मैत्री करून दिली जाते. ते गाढव त्या व्यक्तीसोबत जातं आणि जर आपल्याला गाढवासोबत बरं वाटतंय असं वाटलं तर त्याच्यासोबत ती व्यक्ती हवा तितका वेळ राहू शकते. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक ताण आला आहे. अशा डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी या डाँकी थेरेपीचा आधार घेतला आहे. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो आहे. माद्रिदच्या रुग्णालयात काम करणारी 25 वर्षांची मोरॅल्सने सांगितलं, रुग्णालायत काम करताना खूप तणाव वाढला होता. मी फक्त एक दिवस तिथं एका  10 दिवसांच्या गाढवाला हातात घेऊन कुरवाळलं, खूप बरं वाटलं मला. हे वाचा - कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का? बेड नसल्यामुळे हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पडलेले आणि आपल्या प्रियजनांना न पाहता मरण पावलेल्या रुग्णांना पाहताना डॉक्टर्समनावर मोठा आघात होतो. अशावेळी त्यांचं मन हलकं करण्यासाठी या गाढवांची मदत होते, असं डॉ. नेविस यांनी सांगितलं. आतापर्यंत 25 डॉक्टर आणि परिचारिकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. त्यांचा अनुभव अतिशय चांगला होता. नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणारा या उपक्रमाच्या मुदतीत आणखी वाढ होणार आहे. शिवाय तिथं राहण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या