मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अक्षय्य तृतीया 2021 : धन आणि समृद्धीसाठी या गोष्टींचं दान ठरेल लाभदायक

अक्षय्य तृतीया 2021 : धन आणि समृद्धीसाठी या गोष्टींचं दान ठरेल लाभदायक

सध्या भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown)लागू करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही घरी राहूनच लक्ष्मी मातेची पूजा करून अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) साजरी करा. आज कोणतं कार्य केल्यावर यश, धन आणि वैभव मिळतं तसंच काय दान करायचं ते जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

मुंबई 14 मे : आज अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हणजेच हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. परंपरेनुसार आज लोक घरी लक्ष्मीची पूजा करतात आणि सध्याच्या काळानुसार ऑनलाईन सोनं खरेदी (Online Gold Jewellery Shopping) करतात. आजच्या दिवशी सुरू केलेल्या एखाद्या नव्या गोष्टीला अक्षय्य असं यश मिळतं आणि आज धार्मिक कार्य केली तर अक्षय्य पुण्य मिळतं. अक्षय्य तृतीयेला दान केलं तर त्याच्या कितीतरी पट अधिक त्याचं फळ मिळतं असंही मानलं जातं. सध्या भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown)लागू करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही घरी राहूनच लक्ष्मी मातेची पूजा करून अक्षय्य तृतीया साजरी करा. आज कोणतं कार्य केल्यावर यश, धन आणि वैभव मिळतं तसंच काय दान करायचं ते जाणून घेऊया.

अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मशास्रानुसार प्रचंड शुभ दिवस मानलं जातं. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी दान केल्याने अक्षय्य पुण्य मिळतं. अक्षय तृतीयेला सातु, गहू, चणे, दही, तांदुळ, फळं आणि इतर धान्य यांचं दान करावं.

पितरांचा मिळतो आशिर्वाद:

अक्षय्य तृतीयेला पुजा केली तर तुमची पितरं तुमच्यावर कृपा करतात आणि तुम्हाला आशिर्वाद देतात असंही मानलं जातं.

पाण्याचं दान:

जीवमात्रांना पाणी प्यायला दिल्याने खूप पुण्य मिळतं, अशी हिंदू धर्मातली धारणा आहे. माणसाला पाणी प्यायला देणं म्हणजेच जलदान करणं हे सर्वात महत्त्वाचं दान आहे. पाणपोई उभारण्यासाठी तुम्ही ऑनलाईन दान करू शकता. लोकांना स्वच्छ पाणी प्यायला उपलब्ध करून देण्यासाठी पाणपोई पण उभारू शकता. स्कन्द पुराणानुसार अक्षय्य तृतीयेला जलदान केलं तर महापुण्य प्राप्त होतं. तसंच शिवलिंगावर मटकीचं दान केलं तर ते चांगलं मानलं जातं.

चपलांचं दान:

अक्षय्य तृतीया वैशाखात येते त्यामुळे हवामान प्रचंड गरम असतं. त्यामुळे लोकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी व्यवस्था करणं, छत्री वाटणं, पंखा दान करणं किंवा चपलांचं दान करणं हे खूप पुण्याचं काम मानलं जातं. लॉकडाउनच्या काळात या वस्तू दान करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पैसे देऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही अक्षय्य तृतीया साजरी केली तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ शकते. उन्हाचा चटका बसत असेल आणि अशा कष्टकरी माणसाला चप्पल वापरायला मिळाली तर तो नक्कीच आनंदी होऊन तुम्हाला अनेकानेक आशिर्वाद देईल. तहानेलेल्याला पाणी मिळालं तर तो जे आशिर्वाद देईल त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल.

First published:

Tags: Akshaya tritiya, Gold