वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे. कित्येक रुग्णांचा याने बळी घेतला आहे. किमान 15 दिवस तरी यावर उपचार घ्यावे लागत आहेत. काही रुग्णांना तर कोरोनामुक्त होण्यासाठी यापेक्षा अधिक कालावधी लागतो आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांमध्येही काही समस्या, लक्षणं कायम राहत असल्याचं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) यांनी आपला मुलगा बॅरोन ट्रम्प 15 मिनिटांतच कोरोनामुक्त झाला असा दावा केला आहे.
निवडणूक रॅलीत ट्रम्प यांनी आपला 14 वर्षांचा मुलगा बेरॉन ट्रम्पच्या (barone trump) कोरोनाबाबत माहिती दिली. पेन्सिलव्हेनियातील मार्टिन्सबर्ग इथल्या रॅलीत ते म्हणाले, डॉक्टरांना मी बेरॉनच्या कोरोना टेस्टबाबत विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. 15 मिनिटांनी पुन्हा त्याच्या तब्येतीबाबत विचारलं तेव्हा डॉक्टरांनी तो कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं.
शनिवारी व्हिस्कॉन्सिनमध्ये रॅलीतही त्यांनी आपल्या मुलाच्या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख केला. त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याचा कोरोना 15 मिनिटांत पळाला, त्यानंतर त्याने आपल्यासमोर शाळेत जायची इच्छाही व्यक्त केल्याचं ट्रम्प म्हणाले.
हे वाचा - भारत नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; ट्रम्प यांना तोंडावर पाडणारा हा रिपोर्ट
ट्रम्प यांना अमेरिकेतील शाळा सुरू करायच्या आहेत. मात्र अनेक राज्य त्यांच्या या निर्णयाशी सहमत नाही. मुलांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प निवडणूक रॅलीतून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशभरात आपल्या निवडणूक रॅलीत आपल्या मुलाचं उदाहरण देत आहेत. तो कोरोनातून किती लवकर बरा झाला त्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही हे ते दाखवून देत आहेत.
हे वाचा - अलर्ट! Coronavirus नं बदलला मानवी शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग
दुसरीकडे अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाड्रिक्सने सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात 7,92,000 मुलं कोरोना संक्रमित आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील एकून कोरोना प्रकरणांपैकी 11 टक्के कोरोना संक्रमित मुलं आहेत. 8 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरदरम्यान कोरोनाची लागण झालेले 4,555 नवीन मुलं दिसून आली. रिपोर्टनुसार रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांंपैकी 1 ते 3.6 टक्के मुलं होती. मुलांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर 0.23 टक्के होता. मात्र 16 राज्यांनी आपल्या इथं एकाही मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचं सांगतिलं.