मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Local 18 : पश्चिम बंगालमधल्या बांकुरामध्ये आहे ‘हे’ अनोखं संग्रहालय, काय आहे याचं वैशिष्ट्य

Local 18 : पश्चिम बंगालमधल्या बांकुरामध्ये आहे ‘हे’ अनोखं संग्रहालय, काय आहे याचं वैशिष्ट्य

Dollhouse In Bankura

Dollhouse In Bankura

सरकारी कला महाविद्यालयातून शिकलेल्या महादेव मुखर्जी यांनी स्वतःच्या घरातच ‘डॉलहाउस’ अर्थात ‘पुतुल घर’ उभारलंय. या आगळ्या वेगळ्या संग्रहालयात 1200 ते 1300 दुर्मीळ बाहुल्या त्यांनी जतन केल्या आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    बाहुल्या, कळसूत्री बाहुल्या हे केवळ लहान मुलांच्या मनोरंजनाचं माध्यम नाही. याद्वारे लोकसंस्कृतींच्या अनेक खुणा जपल्या गेल्या आहेत. काळाच्या ओघात मनोरंजनाचं हे माध्यम मागे पडत चाललंय. त्यामुळे त्याच्याशी निगडित लोकसंस्कृतीचा वारसाही नष्ट होईल का अशी भीती निर्माण झालीय.

    मात्र पश्चिम बंगालमधल्या बांकुरा जिल्ह्यातल्या एका रहिवाशाने हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न केलाय. सरकारी कला महाविद्यालयातून शिकलेल्या महादेव मुखर्जी यांनी स्वतःच्या घरातच ‘डॉलहाउस’ अर्थात ‘पुतुल घर’ उभारलंय. या आगळ्या वेगळ्या संग्रहालयात 1200 ते 1300 दुर्मीळ बाहुल्या त्यांनी जतन केल्या आहेत.

    प्रत्येक बाहुलीचं रूप वेगळं असतं. भारताच्या विविध लोकसंस्कृतींमध्ये तर बाहुल्यांची विविध रूपं आढळतात. लाकडापासून, धातूपासून किंवा मातीपासून बनवलेल्या बाहुल्या किंवा पपेट्स आज अँटिक म्हणवल्या जातात; मात्र या सर्व बाहुल्यांमध्ये त्या त्या प्रदेशाचा इतिहास, तिथली संस्कृती वसलेली असते.

    कलाकाराच्या हातून घडलेली प्रत्येक बाहुली वेगळी असते. त्याची जाणीव ठेवून महादेव मुखर्जी यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून बाहुल्या गोळा करायला सुरुवात केली. गेल्या 17 वर्षांपासून त्यांनी संग्रह केलेल्या बाहुल्या आता त्यांनी त्यांच्या घरातच मांडल्या आहेत. पश्चिम बंगाल व इतर प्रदेशांचा संस्कृतिक वारसा जपण्यासाठी त्यांनी हा संग्रह केला आहे. यात बलियातोरमधले कलाकार शिवशंक रक्षित यांच्या आईच्या बाहुल्यांपासून ते आफ्रिकेतल्या टांझानियातल्या बाहुल्यांपर्यंतचं वैविध्य पाहायला मिळतं.

    महादेव यांनी प्रत्येक बाहुलीचं नाव आणि तिचा इतिहास लिहून ठेवला आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत स्वतःच या डॉलहाउसची काळजी घेणार असल्याचं ते सांगतात. त्यानंतर योग्य व्यक्तीकडेच याचा कारभार सोपवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

     या बाहुल्यांच्या संग्रहातून देशाच्या विविध लोकसंस्कृतींचा वारसा जपला गेला पाहिजे व त्याचा प्रसार झाला पाहिजे असं त्यांना वाटतं. समाजात लोकसंस्कृतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी असाही यामागचा उद्देश आहे.

    पश्चिम बंगालमधला बांकुरा जिल्हा तिथल्या टेराकोटा अश्वमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. सामान्य घोड्यांसारख्याच, पण वेगळ्या शैलीतील व टेराकोटा मातीपासून या मूर्ती तयार केल्या जातात. टेराकोटा मातीच्या इतर वस्तू व खेळणीही या जिल्ह्यात तयार होतात. त्यामागे अनेक वर्षांची परंपरा आहे

     ही व अशा इतरही काही ठिकाणची परंपरा जपण्यासाठी मुखर्जी यांनी बाहुल्यांचा संग्रह तयार केला आहे. यात असलेल्या बाहुल्या दुर्मीळ आहेत. त्यामुळेच याची जाण असणाऱ्याच्याच हातात हा वारसा पुढे नेण्यासाठी सोपवला जाईल असं मुखर्जी यांचं म्हणणं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle, Local18