Elec-widget

आता कुत्रा एका मिनिटात सांगेल कॅन्सर आहे की नाही

याआधी घेण्यात आलेल्या ट्रायलमध्ये ९३ टक्के कुत्र्यां कर्करोगग्रस्त रुण्गांना ओळखले होते

  • Share this:

ब्रिटिश मेडिकल ट्रायलमध्ये संशोधाकांना वेळीच कॅन्सर आहे की नाही हे जाणून घेण्यात मोठं यश मिळालं आहे. संशोधकांनी सुमारे तीन वर्ष कॅन्सरवर संशोधन केलं. या संशोधनात कुत्र्याच्या मदतीने माणसातील कॅन्सर शोधू शकतो हे स्पष्ट झालं.

ही ट्रायल यॉर्कशायरच्या हुल अन्ड ईस्ट हॉस्पिटल ट्रस्टमध्ये केली गेली. या ट्रायल दरम्यान २ हजार निरोगी आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांचे युरीन सॅम्पल्स घेतले गेले.

या सॅम्पलद्वारे कुत्र्यांना माणसातील कॅन्सर ओळखण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. जर मेडिकल सायन्समध्ये ही ट्रायल प्रक्रिया वापरण्यात आली तर काही मिनिटांतच एखादा रुग्ण कॅन्सरग्रस्त आहे की नाही हे ओळखले जाऊ शकते.

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे त्यांचा स्फोटकं, ड्रग्स पकडण्यासाठी तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अधिक वापर केला जातो. पण या नवीन संशोधनानंतर असं समोर आलंय की कुत्र्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना ओळखण्याचीही क्षमता आहे. आतापर्यंत कुत्र्यांनी आतड्यांचा कॅन्सर शोधून काढला आहे.

जर तुम्हाला कॅन्सरची चाचणी करायची असेल तर त्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. मग कुठं तुम्हाला त्याचा निकाल मिळतो. पण या स्निफर डॉगमुळे कॅन्सरची चाचणी सोपी होऊ शकते.

Loading...

मेडिकल डिटेक्शन डॉगच्या मते कुत्र्यामधील १ लाख कोटी भागांपैकी एक भागात हुंगण्याची क्षमता असते. याचाच फायदा वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येऊ शकतो. याआधी घेण्यात आलेल्या ट्रायलमध्ये ९३ टक्के कुत्र्यां कर्करोगग्रस्त रुण्गांना ओळखले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...