Home /News /lifestyle /

लॉकडाऊनमुळे दूर असलेल्या मालकाला भेटण्यासाठी धडपड; यूएसहून थेट ऑस्ट्रेलियाला एकटीच गेली PIP

लॉकडाऊनमुळे दूर असलेल्या मालकाला भेटण्यासाठी धडपड; यूएसहून थेट ऑस्ट्रेलियाला एकटीच गेली PIP

कोरोना लॉकडाऊनमध्ये दूर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला कधी भेटतो अशी अवस्था फक्त माणसांचीच नाही तर मुक्या जीवांचीदेखील झाली आहे.

    कॅनबेरा, 03 सप्टेंबर :  कोरोना लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown)  आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्ती एकमेकांपासून दूर झाल्या आहेत. कित्येक महिने एकमेकांना भेटल्या नाहीत. कधी एकदा आपण एकमेकांना भेटतो असं प्रत्येकाला झालं आहे. ही अवस्था फक्त माणसांचीच नाही तर मुक्या जीवांचीदेखील आहे. यूएसमधील अशीच एक कुत्री (dog) तिच्या मालकाला लॉकडाऊनमुळे कित्येक महिने भेटू शकली नाही. अखेर एकटीनेच प्रवास करत तिने अमेरिकेहून थेट ऑस्ट्रेलिया गाठलं. पिपस्क्वेक (Pipsqueak) नावाची ही कुत्री. तिची मालकीण झोइ आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला गेली. ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या देशातून पाळीव प्राण्यांना नेण्याचे नियम कडक आहेत आणि काही दिवसांत आपण परतू म्हणून झोइने पिपला आपल्या सोबत ऑस्ट्रेलियाला नेल नाही. तिनं पिपला आपली मैत्रीण लेन विलयम्सकडे  ठेवलं. मात्र त्यांच्या योजनेप्रमाणे काहीच झालं नाही. लेनकडे आधीच दोन कुत्रे होते, त्यामुळे आणखी तिसऱ्या कुत्र्याला सांभाळणं तिला शक्य होत नव्हतं. मग तिने पिपची जबाबदारी घेण्यासाठी कुणी उत्सुक आहे का यासाठी एक जाहिरात दिली. तीन जणांनी ही जाहिरात पाहून संपर्क केला. त्यापैकी एक म्हणजे एलेन स्टेनबर्ग. सीएनएन ट्रॅव्हलशी बोलताना स्टेनबर्ग म्हणाली, "पिपला कुणाकडे जायचं आहे हे तिनं ठरवायचं होतं आणि तिनं आम्हाला म्हणजे मला आणि माझा कुत्रा फ्रँकलीकडे येण्याचं ठरवलं. काही दिवसांनी ती आमच्याकडे आली" हे वाचा - गरम व्हायला लागलं म्हणून इर्मजन्सी डोअरमधून विमानाबाहेर आली महिला दरम्यान दुसरीकडे पिपची मूळ मालक झोइ पहाटेच चार वाजता उठली आणि पिपला यूएसहून ऑस्ट्रेलियाला आणण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रं भरून तयार केली. मात्र कोरोनामुळे कडक नियम लागू होते. त्यामुळे झोइ किंवा तिच्या कुटुंबातील कुणालाही यूएसला जाऊन पिपला ऑस्ट्रेलियाला आणणं शक्य नव्हतं. पर्याय एकच होता पिपला अमेरिका ते ऑस्ट्रेलिया इतका प्रवास एकटीलाच करावा लागणार होता. हे वाचा - एक नंबर! साडीवरच महिलेने मारला FLIP ; स्टंटच्या VIDEO ने सोशल मीडियावर आग लावली आपल्या मालकिणीला भेटण्यासाठी पिपने तेही करून दाखवलं. यूएस ते ऑस्ट्रेलिया इतका प्रवास तिने एकटीने केला आणि अखेर 11 ऑगस्टला पिप ऑस्ट्रेलियाला झोइकडे पोहोचली. तब्बल पाच महिन्यानंतर ते एकमेकांना भेटले आणि याचा आनंद दोघींनाही झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या