मुंबई, 11 जानेवारी : मंदिरात गेल्यानंतर आपण तिथं देवाचा आशीर्वाद घेतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर कासवाची प्रतिकृती करतं, ज्याला नमन करून आपण मंदिरात प्रवेश करतो. शंकराचं मंदिर असेल नंदी आणि गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथं उंदराची प्रतिकृती हमखास असते. देवांच्या आशीर्वादासह आपण या प्रतिकृतींसमोरही नतमस्तक होतो. पण कधी एखाद्या कुत्र्याला मंदिरात आशीर्वाद देताना पाहिलं आहे का? असाच व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.
सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिरातील एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये मंदिराबाहेर एक कुत्रा बसला आहे. तो मंदिरातून दर्शन घेऊन जाणाऱ्या भक्तांशी हात मिळवतो आणि त्यांना आशीर्वादही देतो. एका व्यक्तीनं हे दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कुत्रा माणसांप्रमाणे वागणं तसं नवं नाही. तुम्ही त्याला जसं शिकवाल तसा तो वागतो. माणसांप्रमाणे सर्वकाही करतो. पण सहसा पाळीव कुत्र्यांना अशी ट्रेनिंग दिली जाते. पण भटक्या कुत्र्यांच्याबाबतीत सहसा असं पाहायला मिळत नाही.
हे वाचा - ...आणि कांगारूनं चक्क वाघालाच मिठी मारली; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता. मंदिराच्या एक्झिट गेटवर हा कुत्रा बसला आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणारा एक भक्त त्याच्यासमोर हात जोडून नतमस्तक होतो. तेव्हा कुत्रा आपला एक हात वर करतो त्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवतो. जसं की तो त्या व्यक्तीला आशीर्वाद देतो आहे.
आणखी एका व्हिडीओमध्ये तो भक्तांशी हात मिळवतानाही दिसून येतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आता या डॉगचे खूप फॅन्स झाले आहे.
हे वाचा - हल्ला करणाऱ्या सिंहाला श्वानानं पळव, पळव पळवलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO
काहींनी या कुत्र्याचं कौतुक केलं आहे, तर काही जणांनी वेगवेगळे तर्क लढवले आहेत. या डॉगला भेटण्यासाठी ते मुद्दाम मंदिरात जाणार असल्याचंही काही जणांनी म्हटलं आहे. तर काही जणांच्या मते, कदाचित त्याला भूक लागली असावी आणि लोकांकडे तो खाण्यासाठी काही तरी मागत असावा.